ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

Published:November 23, 2022 05:10 PM2022-11-23T17:10:23+5:302022-11-23T17:17:58+5:30

Skin Care Tips In Winter Diet Tips for Glowing Skin : आहारात काही चांगले बदल केल्यास त्याचा मात्र आपले त्वचेचे आरोग्य सुधारण्यास निश्चितच मदत होते.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

थंडीच्या दिवसांत शरीराला पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्वचा कोरडी पडण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी आपण चेहऱ्याला मॉईश्चराजर लावून चेहरा मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. मात्र आहारात काही चांगले बदल केल्यास त्याचा मात्र आपले त्वचेचे आरोग्य सुधारण्यास निश्चितच मदत होते (Skin Care Tips In Winter Diet Tips for Glowing Skin).

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडू नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा याविषयी नुकत्याच काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी थंडीच्या दिवसांत आवर्जून आहारात असायला हवेत असे पदार्थ सांगितले आहेत.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

त्वचा नितळ राहावी यासाठी व्हिटॅमिन ए अतिशय गरजेचे असते, ज्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक मॉईश्चरायजिंग मिळण्यास मदत होते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असल्याने आहारात त्यांचा आवर्जून समावेश करायला हवा.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

व्हिटॅमिन सी मुळे त्वचेतील कोलेजनची निर्मिती होण्यास मदत होते. त्वचेतील कोलेजनची पातळी कमी झाली की चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, चेहरा वयस्कर दिसणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे कोलेजनची पातळी चांगली राहावी यासाठी आहारात व्हिटॅमिन सी चा स्त्रोत असलेले किवी हे फळ आवर्जून खायला हवे.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

बीट हे लोह आणि रक्तवाढीसाठी उपयुक्त मानले जाणारे सलाड आहे. रक्त शुद्ध करण्यासाठीही बीट फायदेशीर ठरते. तसेच त्वचेतील ओलावा टिकून राहावा यासाठी बीट खाणे चांगले असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेतील ओलावा टिकून राहावा यासाठी बीटाचा आहारात आवर्जून समावेश करावा.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी तुळशीचे बी किंवा सब्जा घ्यायला हवे. भिजवलेले बदाम हाही उत्तम पर्याय ठकि शकतो. या गोष्टींतून मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन इ मिळतात. हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश असायला हवा.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

हळद आरोग्यासाठी अनेक कारणांनी फायदेशीर असते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून आपले संरक्षण करण्यास हळद उपयुक्त ठरते. त्यामुळे काही फेसपॅकमध्येही हळद आवर्जून वापरली जाते. म्हणूनच आहारातही हळदीचा उपयोग केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

नारळ पाण्याला सलाईन म्हणून ओळखले जाते. आजारपणात आपल्याला ताकद देणारे नारळ पाणी त्वचेसाठीही तितकेच उपयुक्त असते. त्वचेवरील डाग, पुरळ, काळेपणा, कोरडेपणा दूर होण्यास नारळ पाणी पिण्याने फायदा होतो. त्यामुळे आठवज्यातून किमान ३ वेळा आपल्या आहारात नारळ पाण्याचा समावेश असायला हवा.