Stylish trendy hair style for navratri garba dandiya, How to do hairstyle for garba dandiya?
गरबासाठी करा खास हेअरस्टाईल, बघा ७ ट्रेण्डी- स्टायलिश पर्याय, गरबा खेळताना चारचौघीत उठून दिसालPublished:October 16, 2023 11:43 AM2023-10-16T11:43:17+5:302023-10-16T13:49:33+5:30Join usJoin usNext गरबा- दांडिया खेळायला जाण्यासाठी झटपट मेकअप तर करता येतो. पण हेअरस्टाईल कशी करावी ते कळत नाही. म्हणूनच आता हे काही ट्रेण्डी पर्याय एकदा पाहून घ्या. या हेअरस्टाईल करायला सोप्या आहेत शिवाय गरबा खेळताना त्याची अजिबात अडचणही होणार नाही. अशा पद्धतीचा बन तुम्ही घालू शकता. समोरच्या बाजूने कशीही वेगळी हेअरस्टाईल केली तरी चालेल. पण मागे अशा पद्धतीने चापून चोपून किंवा मेस्सी बन प्रकारातला अंबाडा घालू शकता. यामुळे दांडिया खेळताना मान- पाठ घामाघूम होणार नाही. अशा पद्धतीने वेणी घालणंही खूपच स्टायलिश दिसतं. तुमच्या ड्रेसला मॅचिंग असणारी कोणतीही लेस अशा पद्धतीने वेणीला बांधू शकता... यामुळे चारचौघीत नक्कीच तुमचा लूक वेगळा दिसेल. दांडिया किंवा गरबा खेळताना इंडो- वेस्टर्न कपडे घालणार असाल तर अशी हेअरस्टाईल करू शकता. यामुळे अधिक ट्रेण्डी- स्टायलिश दिसाल. अशा पद्धतीची साईड वेणीही गरबा खेळण्यासाठी छान दिसते. ही वेणी समोर येत असल्याने गरबा- दांडिया खेळताना गर्मी होऊन मान- पाठ घामेजून जात नाही. गरबा- दांडियासाठी केस मोकळे सोडण्याचा विचार असेल तर असं काही हेअर क्लिप, क्लचर लावून हेअरस्टाईल करू शकता. पण असे पाठीवर केस मोकळे असतील तर घाम जास्त येतो. अशा पद्धतीचे हाय पोनीटेलही छान दिसतात. यात तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी हेअरस्टाईल समोरून करू शकता. आणि मागच्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हाय पोनीटेल घालू शकता. ही हेअरस्टाईलही दांडिया खेळण्यासाठी अगदी सुटसुटीत आहे. टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री गरबा २०२३ब्यूटी टिप्सNavratri Mahotsav 2023Garba CornerBeauty Tips