Join us   

घामाची दुर्गंधी होईल कमी, आंघोळीच्या पाण्यात टाका या 7 पैकी किमान एक गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 7:49 PM

1 / 10
१. उन्हाळ्याच्या दिवसांत खूपच घामघाम होतं.. घामामुळे मग दुर्गंध.. अगदी आपल्या आजूबाजूला कोणी आलं तरी आपल्यालाच लाज वाटावी एवढा घाम येतो... अशा वेळी परफ्यूम, डिओ यांचाही उपयोग होत नाही.
2 / 10
२. उन्हाळा असल्यामुळे घाम तर येणारच पण. घामाचं प्रमाण कमी करण्यासाठी तसेच घामामुळे अंगाला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय मात्र आपण नक्कीच करू शकतो.
3 / 10
३. आंघोळीच्या पानात जर काही गोष्टी टाकल्या तर नक्कीच उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्यापासून त्वचेचं संरक्षण होतं आणि घामामुळे शरीराला येणारा दुर्गंधही कमी होतो. त्यामुळे करून बघा हे काही सोपे उपाय.
4 / 10
४. सध्या लिंबू महाग आहेत. अगदी खाण्यासाठीही आणायची सोय नाही. पण तरी हा उपाय लक्षात असू द्या आणि जेव्हा लिंबू स्वस्त होतील तेव्हा करून बघा. एक बादली आंघोळीच्या पाण्यात अर्ध लिंबू पिळा. घाम येण्याचं प्रमाण कमी होईल. तसेच घामोळं, मोठी फोडं आली असतील तर ती देखील कमी होतील.
5 / 10
५. कडुलिंबाची १० ते १५ पाने एक तांब्याभर पाण्यात ५ ते १० मिनिटे उकळून घ्या. यानंतर हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करून त्याने आंघोळ करा.
6 / 10
६. असाच उपाय पुदिन्याच्या पानांचाही करता येतो. पुदिन्याची पाने तांब्याभर पाण्यात उकळा आणि ते पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात टाका.
7 / 10
७. या दिवसांत मोगऱ्याला बहार आलेली असते. मोगऱ्याची १०- १५ फुलं आंघोळीच्या पाण्यात तासभर आधी टाकून ठेवा. या पाण्याने आंघोळ केल्यास मोगऱ्याचा हलका सुगंध तर अंगाला येतोच पण अतिशय फ्रेश वाटतं.
8 / 10
८. एक बादली पाण्यात अर्धा कप कच्च दूध टाका. हे पाणीही अतिशय उत्तम आहे.
9 / 10
९. आंघोळीच्या पाण्यात दररोज एक टेबलस्पून गुलाब जल टाका. हा उपायही घाम आणि त्यापासून येणारा दुर्गंध रोखू शकतो.
10 / 10
१०. कोरडी त्वचा असेल तर उन्हाळ्यात बदाम तेलाने आंघोळ करण्याचा सल्लाही दिला जातो.
टॅग्स : समर स्पेशलब्यूटी टिप्सत्वचेची काळजी