Join us   

Make up Tips for Summer: घामाच्या धारांत मेकअपचे ओघळ? उन्हाळ्यात परफेक्ट मेकअपच्या १० टिप्स, विसरा चिपचिपा चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 2:47 PM

1 / 11
१. उन्हाळ्यात काही जणांना अक्षरश: घामाच्या धारा लागतात. त्यामुळे मग वारंवार चेहरा पुसावा लागतो... हळूहळू चेहऱ्यावरचे मेकअपचे थर निघू लागतात आणि सगळा चेहराच विचित्र दिसू लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात मेकअप करताना काही मेकअप टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
2 / 11
२. उन्हाळ्यात जास्त मेकअप करणं टाळा. कमीतकमी ब्यूटी प्रोडक्ट्स वापरा. उन्हाळ्यात नेहमी हलका मेकअप करावा.
3 / 11
३. चेहरा धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर कापसाच्या बोळ्याने टोनर किंवा रोझ वॉटर चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा चिपचिपित होणार नाही.
4 / 11
४. उन्हाळ्यात शक्यतो ॲलोव्हेरा जेलचा वापर करावा. चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी त्याची मदत होते.
5 / 11
५. यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा. उन्हाळ्यात वापरायचं मॉईश्चरायझर हे लाईटवेट आणि वॉटरबेस असावं, ऑईल बेस नको.
6 / 11
६. यानंतर सनस्क्रिन लावा आणि ५ मिनिटे थांबून ते चेहऱ्यावर सेट होऊ द्या. उन्हाळ्यासाठी सनस्क्रिन निवडताना ते शक्यतो ३० पेक्षा अधिक SPF असणारं असावं. सनस्क्रिन लावल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी बाहेर पडा.
7 / 11
७. त्यानंतर प्रायमर लावा. घाम रोखण्यासाठी उन्हाळ्यात प्रायमर लावणं गरजेचं आहे.. त्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही.
8 / 11
८. उन्हाळ्यात शक्यतो फाउंडेशन लावणं टाळा. कारण खूप मेकअप असला तर उन्हाळ्यात घाम आल्यावर पॅचेस दिसतात. त्यामुळे शक्यतो फाउंडेशन लावणं टाळा. थेट कन्सिलर लावा.
9 / 11
९. चेहऱ्यावरचं अतिरिक्त कन्सिलर टिशू पेपरच्या मदतीने काढून टाका. त्यानंतर कॉम्पॅक्ट लावा. कॉम्पॅक्ट खूप जास्त लावू नका.
10 / 11
१्र०. उन्हाळ्यासाठी लिक्विड आय लायनर लावण्यापेक्षा पेन्सिल लायनर वापरा. ते वॉटरप्रुफ असावं.
11 / 11
११. लिपस्टिक मॅट फिनिशिंग असावी, ग्लॉसी नको.
टॅग्स : ब्यूटी टिप्समेकअप टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी