1 / 5उन्हाळ्यात त्वचेचं टॅनिंग खूप जास्त वाढतं. अशावेळी काकडीचा उपयोग करून त्वचेची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेता येते (summer special skin care tips). त्यासाठी नेमकं काय करायचं आणि त्वचेसाठी कशा पद्धतीने काकडीचा वापर करून घ्यायचा ते पाहूया...(4 ways to use cucumber for young glowing skin)2 / 5१. काकडीचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रात्री झाेपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि हे होममेड टोनर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेमधली लवचिकता टिकून राहील आणि सुरकुत्या येण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.(how to use cucumber for skin care in summer?)3 / 5२ चमचे काकडीचा रस घ्या. त्यामध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल घाला. हे मिश्रण व्यवस्थित भरून एखाद्या काचेच्या डबीमध्ये ठेवा. हे तयार झालं तुमचं घरगुती नाईट क्रिम. रात्री झोपण्यापुर्वी हे क्रिम चेहऱ्याला लावून मसाज करा. त्वचेवर नेहमीच छान ग्लो राहील.4 / 5३. काकडीचा रस, बटाट्याचा रस, दही आणि बेसन हे चार पदार्थ एकत्र करा. आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे चेहऱ्यावर तसाच राहू द्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.5 / 5४. हे सगळं करायला वेळ नसेल तर काकडीचा किस चेहऱ्याला लावून मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवा. त्वचा छान तुकतुकीत होईल.