दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

Published:October 31, 2024 10:12 PM2024-10-31T22:12:40+5:302024-10-31T22:24:57+5:30

Tips To Do Celebrity Like Makeup On Diwali : Celebrity Like Diwali Makeup Look : सेलिब्रिटींसारखा फ्लॉलेस मेकअप करुन दिवाळीत दिसाल चारचौघीत एकदम हटके...

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

सणवार, खास प्रसंग असला की सगळ्याच स्त्रिया मेकअप करणे पसंत करतात. दिवाळी निमित्त स्त्रियांना नटणे, मेकअप (Tips To Do Celebrity Like Makeup On Diwali) करणे खूप आवडते. या दिवसात स्त्रिया सुंदर पोशाख घालतात, त्यावर शोभून दिसतील असे दागिने आणि मेक-अप देखील करतात. मेकअपमुळे आपला लूक अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. जर तुम्ही सुद्धा दिवाळी मेकअप करताना एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे लूक हवा असेल तर या काही आवश्यक टिप्स फॉलो करा(Celebrity Like Diwali Makeup Look).

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

१. सगळ्यातआधी स्किनकेअर रुटीनकडे लक्ष द्या. चेहऱ्याच्या त्वचेवर जर डेड स्किनचा थर असेल तर मेकअप त्वचेवर व्यवस्थित सेट होणार नाही. यासाठी आधी स्क्रबिंग करुन डेड स्किन स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्वचेचे क्लिंजिंग आणि मॉइश्चरायझिंग करावे.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

२. मेकअप करताना त्वचेला मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्यावर प्रायमर लावावे. यामुळे मेकअप चेहऱ्यावर थापल्यासारखा दिसत नाही. हा उपाय केल्याने मेकअपसाठी एक चांगल्या प्रकारचा बेस तयार होतो.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

३. आपल्या स्किन टोननुसार मेकअप शेडची निवड करावी. आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा एक शेड लाईट मेकअप केला तर मेकअप फिकट आणि डल दिसतो. तसेच एक शेड डार्क निवडल्याने मेकअप अधिकच गडद दिसून चेहरा खूप डार्क किंवा काळपट दिसतो. यामुळे आपल्या स्किनटोननुसार मॅच होणाऱ्याच शेड्सचीच निवड करावी.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

४. जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा असमान असेल किंवा तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील तर कन्सीलर किंवा कलर करेक्टरचा देखील वापर करु शकता.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

५. आयलायनर किंवा काजळ लावल्यानंतरच मस्करा लावा. पापण्यांना अधिक नॅचरल लूक येण्यासाठी, मस्कराचा फक्त एकच थर लावा. अनेक थरांमुळे पापण्या जाड दिसतात.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

६. लिपस्टिक लावण्यापूर्वी मेकअपच्या सुरुवातीला ओठांवर लिप बाम लावा. यामुळे ओठ ओलसर राहतात आणि लिपस्टिक देखील कोरडी दिसत नाही.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

७. ओठांवर थेट लिपस्टिक लावण्याऐवजी, प्रथम लिप लायनरने ओठांना आऊटलाईन करुन घ्या. यानंतर, त्यावर लिपस्टिक लावल्याने लिपस्टिकचा रंग देखील अधिक खुलून येण्यास मदत होते.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

८. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रिम बेस्ड ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरा. जर त्वचा जास्त तेलकट असेल तर तुम्ही पावडर किंवा वॉटर बेस्ड ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करु शकता.

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

९. त्वचेचा तेलकटपणा संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही क्रिम ब्लशऐवजी पावडर ब्लश लावू शकता.