जोजोबा ऑईलचे १० फायदे, त्वचेचे आजार ते चेहऱ्यावरचे डाग घालवणारे हे तेल नेमके असते काय? वापरायचे कसे? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 3:28 PM 1 / 11जोजोबा ही वनस्पती औषधी गुणधर्मांनीयुक्त आहे असे मानले जाते. जोजोबा ऑईलच्या बिया नट्सच्या आकाराच्या दिसतात. या बियांमध्ये सुमारे ५० % तेलाचा समावेश असतो. जोजोबा ऑईल हे मुख्यतः स्किन आणि केसांच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. या ऑईलला एक सौम्य प्रकारचा सुगंध असतो. जोजोबा ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, सिलिकॉन, झिंक, क्रोमियम आणि कॉपर यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जोजोबा ऑईलचा वापर त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींकरता केला जातो.(Top 10 Benefits of Jojoba Oil).2 / 11कोरड्या स्किनसाठी जोजोबा ऑईल अतिशय उपयुक्त ठरते. जोजोबा ऑईल स्किनमधून बाहेर पडणाऱ्या सेबमचे संतुलन राखते. त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. जोजोबा ऑईल चेहरा मॉइश्चराइज करण्यासाठी वापरले जाते; चेहरा स्वच्छ केल्यानंतर पाच - सहा थेंब जोजोबा ऑईलचे आपल्या तळहातावर घ्या आणि गोलाकार आकारात आपल्या चेहऱ्यावर पसरवा.3 / 11जोजोबा ऑईल लिप बामसाठी देखील एक उत्तम पर्याय असू शकते. जोजोबा तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ओठ मऊ राहण्यास मदत होते. तसेच हिवाळ्याच्या दिवसात जर तुमचे ओठ फुटले असतील तर जोजोबा ऑईलयुक्त लीप बामचा वापर नक्की करा. 4 / 11आता पर्यंत मेकअप रिमूव्हर म्हणून खोबरेल तेलाचा वापर केला जात होता. या खोबरेल तेलाची जागा आता जोजोबा ऑईलने घेतली आहे. जोजोबा तेल आपल्या चेहेऱ्यावरील पोर्सना बंद न करता हळुवार त्यातील घाण काढते व स्किन मॉइश्चराइज करते. 5 / 11जोजोबा तेल सौम्य असल्यामुळे तुम्ही बिनदिक्कतपणे डोळ्यांभोवती मसाज करण्यासाठी वापरू शकता. भुवयांचे केस दाट करण्यासाठी २ थेंब जोजोबा ऑईल बोटावर घेऊन भुवयांना मसाज करा. पापण्या जाड दिसाव्यात म्हणून वापरल्या जाणाऱ्या मस्कारामध्ये सुद्धा जोजोबा ऑईलचा समावेश केलेला असतो. 6 / 11जोजोबा ऑईलने केसांच्या मुळांना मसाज केल्यास; केसांच्या मुळांना ते मॉइश्चराइज करते. यामुळे आपले केस हेल्दी आणि मजबूत होतात. 7 / 11जोजोबा ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि हायड्रेटिंचे गुणधर्म असल्यामुळे चेहेऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यास हे प्रभावी ठरते. अनेक त्वचारोग आणि जखमांवर उपचार करण्यासाठीही हे तेल फायदेशीर आहे.8 / 11केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक या जोजोबा ऑईलमध्ये असतात. जर तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल तर केसांच्या वाढीसाठी दररोज जोजोबा ऑईलने केसांना मसाज करा. 9 / 11जोजोबा ऑईलमध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि ओमेगा -६ सारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे स्किनसाठी फायदेशीर असतात. स्किनमधील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. 10 / 11निस्तेज, शुष्क केसांमधील गुंता, स्प्लिट हेअरचा त्रास कमी करण्यासाठी जोजोबा ऑईल फायदेशीर ठरते. शाम्पूमध्ये जोजोबा ऑईलचे काही थेंब मिसळा. या मिश्रणाने केस धुतल्यास हळूहळू स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते. सोबतच केस अधिक मुलायम होण्यास मदत होते. 11 / 11जोजोबा ऑईल हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा वापरले जाते. त्यात असणाऱ्या काही नैसर्गिक घटकांमुळे केसांना चमकदार आणि मऊ बनविण्यासाठी याचा वापर होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications