अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

Published:July 30, 2024 07:38 PM2024-07-30T19:38:37+5:302024-07-30T19:46:24+5:30

Top 5 Indian Celebrities Beauty Secrets : बॉलीवूड अभिनेत्री देखील महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटस, क्रिम्स वापरण्याऐवजी घरगुती सोपे उपाय वापरणे पसंत करतात.

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

बॉलिवूड अभिनेत्रींची स्किन, हेअर स्टाईल, त्यांचे लूक पाहून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. या बॉलिवूड अभिनेत्रींचे फिटनेस, ब्यूटी सिक्रेट, स्किन रुटीन, डाएट एकंदरीत सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यास प्रत्येकाला आवडते. या सगळ्या मोठमोठ्या स्टार्स आपले केस, त्वचा, फिटनेस किंवा इतर गोष्टींची काळजी कशी घेत असतील हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यांचे एखादे सिक्रेट जर आपल्याला कळले तर तेच सिक्रेट आपण देखील फॉलो करुन त्यांच्यासारखे सुंदर दिसू शकतो हा त्या मागचा मुख्य उद्देश असतो. प्रियांका चोप्रा पासून ते अनन्या पांडेपर्यंत सगळ्याचजणी आर्टिफिशियल, महागड्या उपायांसोबतच काही घरगुती उपाय देखील करत असतात. आपणसुद्धा या अभिनेत्रींनी सुचवलेल्या घरगुती उपायांचा वापर करुन सेलिब्रिटी सारखा चेहऱ्याचा ग्लो आणि दाट लांब केस मिळवू शकतो. यासाठी कोणकोणत्या अभिनेत्री कोणते घरगुती उपाय फॉलो करता किंवा त्यांचे ब्यूटी सिक्रेट काय आहे ते पाहूयात (Top 5 Indian Celebrities Beauty Secrets).

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

अनन्या पांडे तिची आई भावना पांडे यांनी सांगितलेले ब्यूटी सिक्रेट कायम फॉलो करते. तिच्या आईने सांगितलेला होममेड फेसमास्क बनवण्यासाठी फक्त २ टेबलस्पून दही, चिमूटभर हळद आणि १ टेबलस्पून मध चांगले मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावून हलक्या हातांनी मसाज करुन घ्यावा. १५ मिनिटांसाठी हा मास्क चेहऱ्यावर असाच ठेवून द्यावा आणि नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हळदीतील अँटीऑक्सिडंट आणि दाहक - विरोधी गुणधर्म मुरुम, पुटकुळ्या कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, दही त्वचेला थंड ठेवते आणि मध त्वचेचे पोषण करते. दर एक दिवसाआड तुम्ही हा उपाय ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी करु शकता.

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

तमन्नाचे केस खूप सुंदर आहेत, त्यासाठी ती खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून केसांना लावते. या उपायामुळे केस गळती थांबते, कोलेजनच्या पातळीत वाढ होते. कांद्याचा रस हेअर ग्रोथमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुम्हीही केसांशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही तमन्नाचा हा उपाय करुन पाहू शकता.

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात लेमन वॉटर पिऊन करते. मलायका कोमट पाण्यांत लिंबाचा रस मिक्स करुन असे पाणी सकाळी उपाशी पोटी पिणे पसंत करते. हे लेमन वॉटर एक इम्यूनिटी बूस्टर आहे. हे पाणी पिऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. त्याचबरोबर मलायका आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये एलोवेरा जेलचा समावेश करते. एलोवेरा जेलचा वापर केल्याने स्किनवरील मुरुम, ऍक्ने, काळे डाग कमी करण्यास मदत होते. यासोबतच एलोवेरा जेल आपल्या स्किनला योग्य ते पोषण मिळवून देण्यास फायदेशीर ठरते.

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

दीपिका पदुकोण तिच्या स्किनचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकवण्यासाठी ब्यूटी रोलर वापरते. त्वचेवर ब्यूटी रोलरचा वापर केल्याने त्वचेतील रक्तप्रवाह सुधारतो, त्वचेला येणारी सूज, डोळ्यांचा पफीनेस कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. यासोबतच स्किन मसाज किंवा त्वचेला थंडावा मिळवून देण्यासाठी ब्यूटी रोलरचा वापर करणे फायदेशीर ठरते. ब्यूटी रोलरचा वापर करताना फक्त लक्षात ठेवा की रोलरचा जास्त वापर करू नका आणि जेव्हा ते वापरता तेव्हा ते त्वचेवर वरच्या दिशेने फिरवा.

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट...

प्रियांका चोप्रा सुंदर केसांसाठी तिच्या आईने सांगितलेले ब्यूटी सिक्रेट फॉलो करते. हा हेअर मास्क वापरल्याने स्कॅल्प आणि केस निरोगी ठेवण्यास मदत मिळते. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात १ टेबलस्पून मध मिक्स करुन हा हेअर मास्क केसांना लावावा. केसांसाठी आपण या हेअर मास्कचा वापर केल्यास केसांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही चांगले राहण्यास मदत मिळते.