Join us   

प्या ५ ज्यूस, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! महागड्या क्रिम चोपडण्यापेक्षाही सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2023 6:14 PM

1 / 8
१. हल्ली प्रदुषणाचा खूप जास्त परिणाम त्वचेवर होतो. त्याचबरोबर जंकफूडचे वाढलेले प्रमाण, आहारातून पोषण मुल्यांची असणारी कमतरता, वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा चेहऱ्यावर सतत होणारा मारा... यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे.
2 / 8
२. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे क्रिम तसेच इतर कॉस्मेटिक्स वापरतो. पण यामुळे त्वचेवर तात्पुरता परिणाम दिसून येतो. पण त्वचेवर नैसर्गिक आणि कायमस्वरुपी टिकणारा ग्लो द्यायचा असेल तर मात्र आपल्या आहारातच थोडा बदल करायला हवा.
3 / 8
३. म्हणूनच आता आपण पाहूया त्वचेला पोषण देऊन तिला चमकदार बनविणारे कोणते पदार्थ आहेत. या फळांचा किंवा भाज्यांचा ज्यूस- सूप करा आणि ते नियमित घेत चला. यामुळे त्वचेचा पोत नैसर्गिकरित्याच सुधारला जाईल आणि त्वचा चमकदार होण्यास मदत मिळेल.
4 / 8
४. यापैकी सगळ्यात पहिला आहे बीटरुटचा ज्यूस. त्यामुळे तुम्हाला नॅचरल पिंकिश ग्लो येईल. बीटमधून व्हिटॅमिन ए, सी, के तसेच पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते. दुपारच्या जेवणात हा ज्यूस घेतल्याने अधिक फायदा होतो.
5 / 8
५. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात पुरविणारे टोमॅटो त्वचेची खूप काळजी घेतात. त्यामुळे १ चमचा मध टाकून टोमॅटाेचा ज्यूस नाश्त्याच्या वेळी घ्यावा.
6 / 8
६. ॲक्ने, पिगमेंटेशन, पिंपल्स याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना गाजराचा ज्यूस पिणे फायदेशीर होतो. हा सगळा त्रास तर कमी होईलच, पण त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत होईल. हा ज्यूसही नाश्त्याच्या वेळी घेणे चांगले असते.
7 / 8
७. त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत, त्वचेचा टाईटनेस टिकून राहावा म्हणून मोसंबी किंवा संत्र्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. नाश्त्याच्या वेळी किंवा सायंकाळी हा ज्यूस प्यावा.
8 / 8
८. लिंबू पाणी पिणे त्वचेच्या दृष्टीने सगळ्यात जास्त फायदेशीर मानले जाते. त्यामुळे शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. याचा परिणाम म्हणजे शरीर आतून शुद्ध होते आणि त्यावर छान चमक येऊ लागते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीफळेभाज्या