केस गळतीमुळे कपाळ मोठं दिसतंय? अर्धा चमचा हळद या पद्धतीने केसांना लावा-दाट होतील केस By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 8:39 AM 1 / 8भारतीय पदार्थांमध्ये मसाले हे खूपच महत्वाचे मानले जातात. सगळ्यात जास्त स्वंयपाकात हळदीचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त कोणतंही अन्न अपूर्ण असते. यातील पोषक तत्वांमुळे शरीराला बरेच फायदे मिळतात2 / 8केसांना मजबूत बनवण्यापासून केसांची चांगली वाढ होण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी हळद महत्वाची मानली जाते. ज्यामुळे केस मजबूत राहतात. हळदीचा मास्क केसांना लावल्याने बरेच फायदे मिळतात. 3 / 8हळदीची पावडर दही किंवा नारळाच्या तेलाबरोबर तुम्ही पेस्ट बनवू शकता. केस आणि स्काल्पवर लावा २० ते ३० मिनिटं लावलेलं राहू द्या त्यानंतर व्यवस्थित धुवा. 4 / 8हळद पावडर मधात मिसळून मास्क तयार करा. केसांमध्ये चमक येते आणि केस कोमल राहतात. हे कपडे धुवून १५ ते २० मिनिटं तसंच राहू द्या. 5 / 8हळद पावडर नारळाच्या किंवा बदामाच्या तेलात मिसळून हळदीच्या तेलाने स्काल्पची मसाज करा. डिप कंडिशनिंगसाठी रात्रभर सोडून द्या, ज्यामुळे केस चांगले राहतील. 6 / 8हळद पावडर आणि एलोवेरा जेल मिसळून हा हेल्दी हेअर मास्क केसांना लावा. ज्यामुळे स्काल्पची समस्या उद्भवणार नाहीत. 7 / 8यातील एंटी फंगल आणि जीवाणूरोधी गुण डँड्रफ आणि खाज येत असेल तर या समस्यांपासून आराम देतात.8 / 8हळदीच्या वापराने केस तुटणं कमी होतं, हळद पावडर मुख्य स्वरूपात रक्त परिसंचयण सुधारण्यास मदत होते आणि केस चांगले वाढतात आणखी वाचा Subscribe to Notifications