Join us   

पिवळट दात पांढरेशुभ्र होऊन मोत्यासारखे लख्ख चमकतील- बघा केळीच्या सालींचा खास उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 1:43 PM

1 / 7
दात पिवळट झाले असतील तर केळीच्या सालीचा हा खास उपयोग करून पाहा. दात स्वच्छ होऊन अगदी मोत्यासारखे लख्ख चमकतील....
2 / 7
केळी खाऊन तिचे साल आपण टाकून देतो. पण अनेक गोष्टींसाठी हे साल खूप उपयुक्त ठरते.
3 / 7
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर कसा करायचा ते पाहूया.
4 / 7
हा उपाय करण्यासाठी केळीच्या सालीचा आतला भाग तुमच्या दातांवर १ ते २ मिनिटे घासा.
5 / 7
त्यानंतर पुढे १० ते १५ मिनिटे चूळ भरू नका आणि काहीही खाऊ- पिऊ नका. केळीच्या सालीचा गर तुमच्या दातांवर तसाच राहू द्या.
6 / 7
साधारण १५ मिनिटांनी टुथपेस्ट न लावता नुसता ब्रश पाण्याने ओलसर करून दातांवर फिरवा आणि चूळ भरून टाका.
7 / 7
दातांचा पिवळेपणा कमी झालेला दिसेल. हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा. खूप चांगला परिणाम दिसून येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सहोम रेमेडी