कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

Updated:February 27, 2025 17:10 IST2025-02-27T17:05:17+5:302025-02-27T17:10:13+5:30

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

चेहऱ्यावरचे पिंपल्स, ॲक्ने, वांगाचे डाग कमी करायचे असतील तर जायफळ खूप उपयुक्त ठरू शकते. हा स्वस्तात मस्त उपाय तुमचे सौंदर्य खुलवायला नक्कीच उपयोगी येईल.(use of jayafal or nutmeg for removing pimples, acne and pigmentation)

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

यासाठी जायफळाचा वापर कसा करायचा, याविषयीची माहिती rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की जायफळामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे त्याच्या नियमित वापरामुळे पिंपल्स आणि ॲक्ने कमी होतात.(how to use jayafal for glowing skin?)

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

त्वचा स्वच्छ करणारे अनेक गुणधर्म जायफळामध्ये असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा ते त्वचेवर लावता तेव्हा ते एखाद्या स्क्रबप्रमाणे काम करते आणि डेडस्किन, टॅनिंग काढून त्वचा मऊ, मुलायम करते.

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

पिगमेंटेशन कमी करून त्वचेचा पोत एकसारखा होण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरते.

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

हा उपाय करण्यासाठी १ चमचा कच्चं दूध घ्या आणि ते चंदन उगाळण्याच्या सहानीवर टाका.आता त्यावर जायफळ घासून उगाळून घ्या. ही चॉकलेटी रंगाची पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स, पिगमेंटेशन, ॲक्ने असतील तिथे लावा. आठवड्यातून ३ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावरचे सगळे डाग, पिंपल्स जाऊन त्वचा छान नितळ, स्वच्छ झालेली दिसेल.