चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा तेजस्वी ग्लो, १ हळकूंड घेऊन करा उपाय, पिंपल्स- ॲक्नेही गायब
Updated:February 1, 2025 15:10 IST2025-02-01T15:03:50+5:302025-02-01T15:10:40+5:30

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, ॲक्ने कमी करण्यासाठी, टॅनिंग कमी करण्यासाठी हळद अतिशय उपयोगी ठरते (use of turmeric stick for getting radiant glowing skin). कारण हळदीमधले अँटीबॅक्टेरियलए अँटीफंगल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.(how to get clear beautiful skin?)
आता आपण एक हळकुंड वापरून त्वचेवर कसा ग्लो आणायचा ते पाहूया. हा उपाय carefreesoul2 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी एक हळकुंड घ्या आणि ते एका वाटीत पाणी घालून त्यात २४ तास भिजत ठेवा. रोज सकाळी उठल्यानंतर पाण्यात भिजवलेलं हळकुंड घेऊन ५ ते ७ मिनिटांसाठी चेहऱ्यावर हळूवार फिरवत मसाज करा.
त्यानंतर ४० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. हा उपाय नियमितपणे केल्यास त्वचा छान चमकदार होते.
चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स, टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
तसेच एजिंग प्रोसेसही बरीच कमी होते. सनबर्नमुळे त्वचा खराब झाली असेल तर ती पुन्हा छान चमकदार होऊ लागते.