1 / 11चेहर्यासाठी व त्वचेसाठी औषधी वनस्पतीं एवढं उपयुक्त काहीच नाही. निसर्गाकडून तयार मिळणाऱ्या संसाधनांचा वापर करा .2 / 11अशा ९ वनस्पती आहेत. ज्यांचा वापर करून त्वचा कायम सुंदर राहील. आपल्या ओळखीच्याच वनस्पती असतात पण आपल्याला त्यांचे महत्त्व माहिती नसते.3 / 11तुळशीला देवाचे स्थान दिले जाते. तिची पुजा केली जाते. घरासमोर तुळस हवीच. पण या मागे काही शास्त्रीय कारणे आहेत. तुळस स्वच्छ ऑक्सिजनचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच तुळस त्वचेसाठी चांगली. तुळशीची पाने खात जा. रस प्या. तो चेहर्याला लावा.4 / 11चंदन थंड असते. चंदनात अनेक औषधी सत्व असतात. चंदन,चंदन पावडर आरामात कुठेही मिळते. चंदन उगाळून चेहर्याला लावा. त्याचा शरीरासाठीही फार उपयोग होतो. चंदनाने डाग, डेडस्किन निघून जाते.5 / 11गुळवेलीबद्दल फार लोकांना माहितीच नाही. खरंतर ती फारच जास्त औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. गावाकडे लोकं गुळवेल चेहर्यासाठी वापरतात. त्वचा चांगली राहण्यास मदत होते. सुरकुत्या निघून जातात.6 / 11आपण कोरफडीचे प्रोडक्ट्स वापरतो. केसांसाठी आहेच आणि त्वचेसाठीही. कोरफडीचे रोप घरी लावणे फार सोपे. जास्त काळजी घ्यावी लागत नाही. ताजा अर्क चेहर्याला केसांना लावणे जास्त फायदेशीर ठरेल. 7 / 11आवळा जसा केसांसाठी चांगला तसाच त्वचेसाठीही आहे. आवळ्यात जीवनसत्त्व 'सी' भरपूर असते. त्यामुळे तारूण्य टिकून राहते. आवळ्यात अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. आवळा खाणं फार पौष्टिक आहे.8 / 11केसर महाग आहे. पण त्वचेसाठी प्रचंड उपयोगी आहे. मधेच कधीतरी वापरायला हरकत नाही. वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी केसर वापरतात. 9 / 11अश्वगंधेच्या वेलीला आयुर्वेदात प्रचंड महत्त्व आहे. आजारांपासून त्वचा रोगांपर्यंत सगळ्यावरच अश्वगंधा गुणकारी आहे. चहा पावडरपासून ,फेस क्रिमपर्यंत सगळ्यात अश्वगंधेचा वापर केल्याचे कंपन्या सांगतात. त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा वेलीवरून पाने तोडून ताजीच वापरा.10 / 11कडुलिंबाचा पाला दातांसाठी चांगला. तसेच त्याचा लेप चेहर्यासाठी चांगला. त्वचेवरील छिद्रांमधे अडकलेली घाण हा लेप काढून टाकेल. केसांसाठी ही पाने पाण्यात उकळून ते पाणी लावणे फार चांगले ठरते.11 / 11विकतच्या हळदीचे लेप आपण लावतो. आणि फायदा झाला नाही म्हणतो. विविध प्रक्रियांतून गेलेल्या हळदीपेक्षा हळकुंड उगाळून वापरणं गुणकारी ठरेल. बाजारात हळकुंड आरामात विकत मिळते. घरोघरी ते असतेच. त्याचा वापर त्वचेसाठी करा.