1 / 7वटसावित्री पौर्णिमेच्या पुजेसाठी झटपट मेकअप करून तयार व्हायचं असेल तर या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा. यामुळे तुमचा मेकअप अगदी पटकन तर होईलच, पण तो अतिशय सुंदरही होईल. 2 / 7मेकअप करण्यापुर्वी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याला टोनर आणि माॅईश्चराईज करून घ्या.3 / 7यानंतर कलर करेक्टर लावा. ते नसेल तर थेट कन्सिलर लावलं तरी चालेल. डोळ्यांखालची काळी वर्तुळं तसेच ओठांच्या आजुबाजुला असणारा थोडा काळसर भागा याठिकाणी कन्सिलर आवर्जून लावा.4 / 7यानंतर फाउंडेशन लावून घ्या आणि त्यावर कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावून छान बेस तयार करून घ्या.5 / 7आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी सगळ्यात आधी आयशॅडो आणि काजळ लावा. त्यानंतर अलगदपणे मस्कारा लावा. 6 / 7गरज वाटल्यास भुवयांवरून आयब्रो पेन्सिल फिरवून घ्या. छानशी टिकली लावा.7 / 7यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावण्यापुर्वी लीप लायनरचा वापर जरुर करा. सगळ्यात शेवटी चेहऱ्यावर मेकअप फिक्सर स्प्रे करा. यावर छानशी हेअरस्टाईल केली की झाला तुमचा वटसावित्री पौर्णिमा लूक तयार...