परफ्यूम भसाभसा अंगावर फवारताय? शरीरावर ७ ठिकाणी हलकासा लावा- राहाल दिवसभर फ्रेश-दुर्गंधी गायब Published:March 21, 2023 04:14 PM 2023-03-21T16:14:21+5:30 2023-03-21T16:22:30+5:30
Wanna smell fresh all day? Apply perfume on these spots परफ्यूम नेमका कसा लावायचा, किती लावायचा हेच माहिती नसलं तर परफ्यूमही संपतो आणि दुर्गंधीचा त्रास कायम राहतो. उन्हाळा सुरु झाला आहे. या दिवसात शरीरातून प्रचंड घाम येतो. घामाचा दुर्गंध लपवण्यासाठी आपण परफ्यूम किंवा डिओड्रेंटचा वापर करतो. काही वेळेला परफ्यूम किंवा डिओड्रेंट लावूनही शरीरातून दुर्गंधी निघत नाही. काही परफ्यूमचा प्रभाव लवकर कमी होतो. अनेकांना असे वाटते की, फक्त अंडरआर्म्सवरूनच घामाचा दुर्गंध येतो. त्यामुळे आपण त्याच ठिकाणी परफ्यूम किंवा डिओ लावतो. पण तुम्हाला माहित आहे का, फक्त अंडरआर्म्स नाही तर, शरीराच्या इतर ठिकाणीही परफ्यूम फवारल्यास त्याचा सुगंध संपूर्ण शरीरातून येत राहेल. जर आपल्याला परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकवून ठेवायचे असेल तर या टिप्स फॉलो करा(Wanna smell fresh all day? Apply perfume on these spots).
दररोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी हाताचा वापर होतो. एखाद्याशी हस्तांदोलन करताना आपले व्यक्तिमत्व दिसून येते. यामुळे मनगटावर परफ्यूम लावायला विसरू नका. मनगटावर परफ्यूमअधिक काळ टिकून राहते.
केसांपासून १० इंच लांबीवर परफ्यूम हलके स्प्रे करा. जेव्हा आपण केसांना परफ्यूम लावतो, तेव्हा प्रत्येक वेळी केस पलटताना सुगंध निघतो, त्यामुळे संपूर्ण शरीरात याची सुगंधी पसरते.
मानेवर परफ्यूम स्प्रे केल्याने सुंगध बराच काळ टिकून राहतो. याशिवाय उपस्थितीत लोकांपर्यंत परफ्यूमचा सुगंध पसरतो. ज्यामुळे त्यांनाही फ्रेश आणि रिलॅक्स वाटू लागतं.
उन्हाळ्यात छातीच्या आजूबाजूला जास्त घाम येतो. त्यामुळे कपडे अनेकदा ओलसर होऊन घामाचा वास येऊ लागतो. परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकण्यासाठी छातीवरही परफ्यूम लावायला विसरू नका.
परफ्यूम लावताना कानांच्या मागे लावायला विसरू नका. बाष्पीभवन रोखून ते गंध टिकवून ठेवते. आपण कानांच्या मागे अत्तर किंवा परफ्यूम लावू शकता. हा सुगंध दिवसभर टिकून राहेल.
तज्ञांच्या मते, पल्स पॉइंट्सच्या उबदारपणामुळे सुगंध टिकून राहते, व पसरते. पल्स पॉइंट्सवर परफ्यूम फवारल्याने सुगंध वाढतो, व बराच काळ राहतो. यासाठी नाडीच्या बिंदूंवर थोडेसे परफ्यूम स्प्रे करा.
कोपरच्या आतील भागात उष्णता उत्सर्जित होते, ज्यामुळे सुगंध वेगाने विकसित होते. ही जवळजवळ पल्स पॉइंट्स सारखीच कार्य करते. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना ही टीप उपयोगी पडू शकते. ज्यामुळे सुगंध दरवळत राहेल.