प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

Published:January 9, 2023 01:16 PM2023-01-09T13:16:17+5:302023-01-09T13:33:54+5:30

Priyanka Chopra's Top Tan Removing Hacks : स्किन टॅनिंग घालवण्यासाठी प्रियंका नक्की कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करते ते जाणून घेऊयात.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

प्रियंका चोप्राला सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून आपण सगळेच ओळखतो. प्रियंका आपल्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिटनेसमुळे सारखी चर्चेत असते. प्रियंका फिट राहण्यासाठी जितकी आपल्या शरीराची काळजी घेते तितकीच काळजी ती आपल्या स्किनची देखील घेते. स्किन चांगली राहण्यासाठी ती स्किन रुटीन आवर्जून फॉलो करताना दिसते. स्किन डल होऊ नये किंवा स्किनवरील काळपटपणा हटवण्यासाठी ती काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करते. आपले स्किन टॅनिंग घालवण्यासाठी प्रियंका नक्की कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करते ते समजून घेऊयात (Priyanka Chopra's Top Tan Removing Hacks').

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

टॅन झालेल्या किंवा काळवंडलेल्या स्किनचे टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबाचा रस हा सर्वोत्तम उपाय आहे. लिंबामध्ये असणाऱ्या नैसर्गिक ब्लिचिंग तत्वामुळे स्किनवरील काळपटपणा लगेच दूर होण्यास मदत होते. लिंबाचा रस व पाणी समप्रमाणात घेऊन हे मिश्रण कापसाच्या मदतीने टॅन झालेल्या भागावर लावा. १५ मिनिटे तसेच स्किनवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे स्किनवरील टॅनिंग लगेच निघून जाते.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

स्किनवरील जो भाग टॅन झाला आहे त्या भागावर कोरफडीचा गर लावून घ्या. हा गर २० ते ३० मिनिटे तसाच ठेवून व्यवस्थित वाळवून घ्या. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

गुलाबपाणी वापरून आपण टॅन झालेल्या स्किनचा पोत सुधारु शकतो. १ टेबलस्पून काकडीच्या रसात १ टेबलस्पून गुलाबपाणी घालून ते एकत्रित करून घ्या. हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्यास लगेच फरक पडेल. काकडीच्या रसाऐवजी आपण लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकतो.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

मधामध्ये ब्लिचिंगचे उत्तम गुणधर्म असतात. स्किनवरील टॅनिंग घालवण्यासाठी मध फायदेशीर ठरू शकते. टॅनिंग घालवण्यासाठी मध स्किन टॅन झालेल्या भागावर लावून घ्यावे. १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे टॅनिंग स्किन पुन्हा चमकदार होण्यास मदत होईल.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

चण्याचे पीठ पाण्यात किंवा दुधात भिजवून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट टॅनिंग झालेल्या भागावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चण्याच्या पीठाने टॅनिंग लवकर घालवण्यास मदत होईल.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

आंबे हळद दुधात किंवा पाण्यात भिजवून घ्या. हे एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टच्या वापराने टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

पपईचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट टॅनिंग झालेल्या स्किनवर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ धुवून टाका. पपईच्या वापराने टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.

प्रियंका चोप्रासारखी सुंदर त्वचा हवी? ८ सोपे उपाय, नॅचरल गोष्टीच वापरुन मिळवा नितळ सुंदर त्वचा.

योगर्टमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. यामुळे स्किनवरील टॅनिंग लवकर निघून स्किन परत चमकदर होण्यास मदत होते. स्किन टॅन झालेल्या भागावर योगर्टने मसाज केल्याने टॅनिंग दूर होते.