स्मार्ट- आकर्षक स्त्रियांच्या 10 सवयी! बघा, किती चांगल्या सवयी तुम्हालाही आहेत? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 2:25 PM 1 / 11१. तुम्ही कशा दिसता किंवा तुमचं बाह्यरुप फक्त याच गोष्टीत तुमचा आकर्षकपणा मोजला जात नाही. तर तुमचं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक आकर्षक, स्मार्ट दिसावं, इतरांना तुमच्या असण्याने आनंद व्हावा, यासाठी तुमच्या या काही सवयी तुम्हाला मदत करत असतात. (10 habits of attractive women)2 / 11२. आत्मविश्वासाने वावरणारी प्रत्येक व्यक्तीच देखणी दिसत असते. अशावेळी तिच्या अंगातले कपडे, तिचं दिसणं या गोष्टी मग आपोआपच गौण ठरतात.3 / 11३. स्मार्ट व्यक्ती नेहमीच काही तरी नवं शिकण्याचा, नवं करण्याचा प्रयत्न करत असते. काहीतरी शिकण्याची तिच्यातली उर्मी नेहमीच टिकून असते.4 / 11४. प्रत्येक गोष्टीला हो म्हणून सगळं सहन करत बसणं, हे अजिबातच स्मार्टपणाचं लक्षण नाही. त्यामुळे लोक तुम्हाला गृहित धरायला लागतात. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत किंवा नको आहेत, त्यांना स्पष्ट शब्दांत नाही म्हणायला शिका.5 / 11५. तुम्ही स्मार्ट आणि आकर्षक तेव्हाच दिसाल जेव्हा तुम्ही नियमितपणे व्यायाम करून तुमच्या व्यक्तिमत्त्व अधिक खुलविण्याचा प्रयत्न कराल. नियमित व्यायाम केल्याने आपोआपचं तुमच्या देहबोलीत काही बदल होत जातात. जे तुम्हाला अधिक कॉन्फिडन्ट लूक देण्यात नक्कीच मदत करतात. शिवाय नियमित व्यायामामुळे तुमची उर्जा वाढते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येऊ लागते. 6 / 11६. स्मार्ट, आकर्षक दिसायचं असेल तर अर्थातच तुम्हाला तुमची स्वत:ची काळजी घ्यावीच लागणार. स्वत:साठी रोज थोडासा वेळ काढावाच लागणार. बऱ्याच महिला या बाबतीतच कमी पडतात.7 / 11७. अंगावर एखादी जबाबदारी येताच पळ काढणारी किंवा घाबरून जाणारी व्यक्ती कुणालाच नको असते. त्यामुळे एखादी जबाबदारी अंगावर आलीच तर तिच्याकडे एक आव्हान समजून ते स्विकारता आलंच पाहिजे.8 / 11८. नेहमी आनंदी राहणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची समोरच्यांवर नेहमीच एक वेगळी छाप पडत असते. अशा व्यक्ती सगळ्यांनाच हव्याहव्याशा वाटतात.9 / 11९. सगळ्यांसोबत ज्या व्यक्ती एकदम खुलून राहतात, इगो किंवा स्वत:ची फुशारकी या गोष्टी ज्यांच्या वागण्यातून कधीच जाणवत नाहीत, अशा व्यक्तींसोबत प्रत्येकाचाच एक कम्फर्ट झोन तयार होत असतो. आणि अशा व्यक्तीच नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये अधिक प्रिय होतात.10 / 11१०. उगाच भविष्याची चिंता करायची किंवा भुतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींबाबत तेच तेच उगाळत बसायचं, अनेकांना आवडत नाही. आजच्या काळात जगणाऱ्या, आहे त्या क्षणाचा भरभरून आनंद घेणाऱ्या व्यक्ती लोकप्रिय होतात. 11 / 11११. सगळ्यांसमोर वेगळं आणि मनात वेगळं अशा दुटप्पी वागणाऱ्या व्यक्तींशी लोकांचं पटत नसतं. तुमचा प्रामाणिकपणा आणि जशा आहात तशाच पद्धतीने सगळ्यांसमोर स्वत:ला प्रेझेंट करण्याची सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. आणखी वाचा Subscribe to Notifications