Join us   

मेहेंदीमध्ये चुकूनही मिक्स करु नका ' हे ' पदार्थ, आहेत ते केस गळतील - होईल नुकसान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2024 7:47 PM

1 / 10
केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व पांढरे केस लपवण्यासाठी आपण केसांना मेहेंदी लावतो. केसांना मेहेंदी लावणे हा फार पूर्वी पासूनचा केसांसाठी एक उत्तम उपाय मानला जातो. केसांना मेहेंदी लावल्यामुळे केस काळे, चमकदार, मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते. केसांना कलर करण्यासाठी केमिकल्सयुक्त हेअर कलरचा वापर करण्याऐवजी आपण मेहेंदी लावणे कधीही पसंत करतो. केसांना मेहेंदी लावताना तिची पोषक तत्व वाढावीत तसेच केसांना अधिक पोषण मिळावे यासाठी आपण त्यात अनेक पदार्थ मिक्स करून केसांना लावतो. परंतु मेहेंदीमध्ये असे अनेक पदार्थ मिक्स करून लावल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. यासोबतच मेहेंदीमध्ये असे अनेक पदार्थ मिक्स करून लावल्याने या मेहेंदीतील महत्वाची पोषक तत्व आपल्या केसांना पूर्णपणे मिळत नाही. यासाठी मेहेंदीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करु नयेत ते पाहुयात(What are the bad ingredients in henna).
2 / 10
मेहेंदीमध्ये कधीही केमिकल्सयुक्त डाय चुकूनही मिक्स करु नका. मेहेंदी हा एक नैसर्गिक घटक आहे. याउलट डाय मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. यामुळे काहीवेळा यात रासायनिक क्रिया होऊन याचा वाईट परिणाम आपल्या स्कॅल्प आणि केसांवर होऊ शकतो. यामुळे स्कॅल्प आणि केसांचे नैसर्गिक सौंदर्य खराब होऊ शकते.
3 / 10
लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. परंतु लसूण थेट केस आणि स्कॅल्पवर लावल्याने स्कॅल्पला जळजळ आणि खाज सुटू शकते. लसणाचा तिखट स्वाद स्कॅल्पच्या त्वचेला अनेक प्रकारे इजा करु शकतो आणि केसांच्या मुळांना हानी पोहोचवू शकतो.
4 / 10
लिंबाचा रस आम्लयुक्त असतो, ज्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि रुक्ष होतात. मेहेंदीमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने केसांची आर्द्रता कमी होते, ज्यामुळे केस तुटतात आणि त्यांचा रंग हळुहळु फिका होऊ लागतो.
5 / 10
मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, परंतु ते मेंहेंदीमध्ये मध मिसळल्याने केसांमधील चिकटपणा अधिक वाढतो. मध आणि मेंहेंदीच्या मिश्रणामुळे केस अतिशय रुक्ष, निर्जीव होतात आणि काळ्याभोर केसांच्या रंगात फरक दिसतो.
6 / 10
व्हिनेगरचा वापर अनेकदा केस स्वच्छ करण्यासाठी तसेच बऱ्याचशा हेअर केअर प्रॉडक्ट्समध्ये केला जातो, परंतु व्हिनेगर मेंहेंदीमध्ये मिसळल्याने केस कोरडे होऊ शकतात. व्हिनेगरचे अम्लीय गुणधर्म केसांचा नैसर्गिक ओलावा कमी करतात, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.
7 / 10
बेकिंग सोडा एक नैसर्गिक क्लिंजर आहे, परंतु मेंहेंदीमध्ये मिसळल्याने केसांचा पीएच बॅलेन्स बिघडू शकतो. यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटण्याची शक्यता असते.
8 / 10
मेंहेंदीमध्ये तेल मिसळल्याने मेंहेंदीचा रंग केसांवर नीट पसरण्यास प्रतिबंध होतो आणि मेंहेंदीमधील चांगली पोषक तत्व आणि हेल्दी गुणधर्म आपल्या केसांना मिळत नाही.
9 / 10
दह्यामध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे केसांना मऊ करतात. असे असले तरीही मेंहेंदीमध्ये दही मिसळल्याने केसांची नैसर्गिक चमक कमी होऊ शकते तसेच केसांमध्ये चिकटपणा अधिक वाढू शकतो. यामुळे मेहेंदीमध्ये कधीही दही मिसळून लावू नये.
10 / 10
केसांना थंडावा देण्यासाठी कापूर वापरला जातो. परंतु मेंहेंदीमध्ये कापूर मिसळल्यास स्कॅल्पच्या त्वचेला जळजळ आणि खाज येऊ शकते. मेहेंदी मध्ये कापूरच्या वापराने केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजी