यामी गौतमच्या सादगीवाल्या नितळ सौंदर्याचे सिक्रेट काय? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 6:34 PM 1 / 10हिंदी चित्रपटांसोबतच तेलगू आणि तामिळ चित्रपटातही नाव कमावणार्या यामी गौतमचं लग्न झालं आणि तिच्या सौंदर्याची चर्चा नव्यानं होवू लागली.2 / 10फेअर अँण्ड लव्हली गर्ल म्हणून प्रेक्षकांवर छाप पाडणार्या यामीनं विकी डोन्र, बदलापूर, काबिल, बाला य चित्रपटातल्या भूमिकांमधून सौंदर्यासोबतच अभिनयाच्या बाबतीतही आपली ओळख निर्माण केली.3 / 10ताजा तवाना, चमकदार चेहेरा आणि त्यावरचं तिचं लांबलचक मोकळं हसू ही यामीच्या सौंदर्याची मुख्य खूण. आपल्या ब्यूटी सिक्रेटबद्दल यामी मोकळेपणानं बोलते.4 / 10यामी त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी ब्युटी प्रोडक्टसपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करते. नारळाचं पाणी, तांदळाचं पीठ, दूध, दही, गावरान तूप, एरंडेल तेल हे तिच्या सौंदर्याचं नैसर्गिक गुपित आहे.5 / 10यामी फेशिअलसाठे टोनर म्हणून नारळाचं पाणी वापरते. ती म्हणते नारळाच्या पाण्यानं चेहेर्याला चमक येते आणि त्वचा ओलसर राहाते.6 / 10त्वचा चांगली होण्यासाठी यामी तांदळाचं पिठ दूधात किंवा दह्यात मिसळून तो लेप नियमित चेहेर्याला लावते.7 / 10त्वचा नैसर्गिकपणे स्वच्छ करण्यासाठी ती मध, गुलाब पाणी, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करुन चेहेर्यास लावते.8 / 10आपल्या पापण्यांच्या सौदर्याचीही यामी विशेष काळजी घेते. त्यासाठी ती एरंडेल तेल, व्हिटॅमिन ई ऑइल आणि कोरफडीचा गर एकर करुन त्याचं मिश्रण लावते.9 / 10ओठाची लाली आणि नरमपणा जपण्यासाठी लिप बाम न वापरता यामी गावरान तूप ओठांना लावते.10 / 10केस चमकदार आणि रेशमी होण्यासाठी यामी अंड्यातला पांढरा भाग आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन ते मिर्शण हेअर मास्क म्हणून केसांना लावते. आणखी वाचा Subscribe to Notifications