White Hair Solution : केस खूप पांढरे झालेत? आठवडभरात काळेभोर होतील केस, फक्त बटाट्याच्या सालीचा असा करा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 4:04 PM 1 / 6कमी वयात केस पांढरे होणे (Grey Hairs) किंवा कमकुवत होणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. (Hair Care Tips) ही समस्या टाळण्यासाठी लोक विविध उपाय देखील करतात. पण परिणाम दिसत नाही. (Home remedies for grey hairs)2 / 6अशा परिस्थितीत केसांमधील काळेपणा परत आणण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या सालीचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील आणि केसांचा रंग परत येण्यास मदत होते. (How to get black hairs naturally)3 / 6रोजच्या वापरातल्या बटाट्याचा वापर तुम्ही केसांच्या पोषणासाठी करू शकता. बटाट्याच्या साली फेकून न देता केसांसाठी वापरल्या तर कमी खर्चात केसांना काळपट रंग आणि चमक येण्यास मदत होईल. बटाटे आणि सालींमध्येही अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि फोलेट मोठ्या प्रमाणात आढळतात.4 / 61) बटाट्याच्या सालीचा हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम बटाट्याची साले काढून टाका. ही साले थंड पाण्यात टाकून उकळा. 5 / 62) 10 मिनिटे उकळल्यानंतर हे पाणी पूर्णपणे थंड करा. हे पाणी भांड्यात बंद करून ठेवा. बटाट्याच्या सालीचे हे पाणी टाळूवर लावा आणि हळूहळू ५ मिनिटे मसाज करा आणि थोडावेळ राहू द्या. 6 / 63) हे बटाट्याचे पाणी केसांवर ३० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. रोज बटाट्याचा वापर केल्यानं केसांवर नैसर्गिक चमक आणि वाढ होण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications