रेखाच्या सौंदर्याला वयाची अटच नाही, काय असावं या मूर्तीमंत सौंदर्याचं रहस्य ? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 7:59 PM 1 / 8रेखा . आजही तिने आपल्या चेहेऱ्यावरची सौंदर्य रेखा तरूण ठेवली आहे. तिचा चेहेरा, तिचे हावभाव, तिचं स्टेजवरचं सहज वावरणं यात कुठेही तिचं वय आडवं येत नाही. नुकतीच इंडियन आयडॉल १२ च्या स्टेजवर रेखा आली आणि चेह ऱ्यावर वयाचा आकडा दिसू न देता रेखाला इतकं सुंदर कसं दिसता येतं हे कोडं पुन्हा सगळ्यांच्या मनात घालून गेली.2 / 8सौंदर्याचं प्रतीक बनलेल्या रेखाच्या वयापलिकडील मोहकतेचं गुपित कॉस्मेटिक्स ट्रीटमेण्ट आणि ब्यूटी सर्जरी या कृत्रिम उपायात नसून यामागे तिनं स्वत:साठी घालून दिलेले सौंदर्य नियम आणि शिस्त आहे. हे नियम आणि शिस्त पाळण्यात आजही तिचं वय आड येत नाही.3 / 8१० ते १२ ग्लास पाणी पिण्याचा नियम रेखा घरात असू देत नाहीतर स्टेजवर पाळतेच, त्वचा नैसर्गिकरित्या आर्द्र ठेवण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाण्यासारखं दुसरं औषध नाही असं रेखा म्हणते.4 / 8लवकर झोपणं, लवकर उठणं ही झोपेची शिस्त सौंदर्य टिकवण्यासाठी आणि कामासाठीची ऊर्जा शरीरात निर्माण करण्यासाठी रेखाला आवश्यक वाटते. ती झोपेचं वेळापत्रक कधीच बिघडू देत नाही.5 / 8सौंदर्यालाही पोषकता महत्त्वाची असते. यावर विश्वास असलेली रेखा सकस आहारालाच महत्त्व देते, पोषणमूल्ययुक्त आहार घेताना तिला कधीही चटपटीत अन तळलेल्या पदार्थांचा मोह होत नाही.6 / 8आयुर्वेद आणि अॅरोमा थेरपीवर रेखाचा विश्वास आहे . त्वचेची काळजी घेण्यासाठी ती वरचेवर स्पामधे किंवा घरातही अॅरोमा थेरेपी घेते.7 / 8रेखा शिस्तबध्दपणाला खूप महत्त्व देते. शिस्त पाळते म्हणून सतत गंभीर दिसण्या वागण्याची गरज नसते असं ती म्हणते. उलट ताणरहित आणि आनंदी जगा हे ती स्वत:ला आणि इतरांनाही सांगते.8 / 8शिस्तबध्दता ही केवळ शरीरालाच नाही तर मनाला, आयुष्याला सुंदर करते असा रेखाचा विश्वास आहे. हा विश्वास, नियम आणि शिस्तबध्दताच वयाची चौकट ओलांडून सुंदर आणि मोहक दिसणाऱ्या रेखाचं गुपित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications