Winter glowing skin tips : चेहरा खूप काळपट, कोरडा पडलाय? ४ उपाय, थंडीतही त्वचा दिसेल मऊ, ग्लोईंग By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 6:57 PM 1 / 6थंडीत त्वचा कोरडी पडून स्किन प्रोब्लेम्स उद्भवतात. हिवाळ्यात उन्हात बसल्याने एक वेगळाच आराम मिळतो. कितीही उबदार कपडे घातले तरी खरी थंडी उन्हात गेल्यावरच निघून जाते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि त्वचेचा रंगही गडद होतो. (Winter Skin Care Tips)2 / 6या दिवसात काळ्या पडलेल्या त्वचेवर घाण जमा झाल्यासारखे दिसते. हिवाळ्यातील उन्हापासून आणि काळेपणापासून बचाव करण्यासाठी अनेक कोल्ड क्रिम्स आणि सनस्क्रीन ट्रेंडमध्ये आहेत. काही घरगुती उपायांनी त्वचेचा काळपट होण्याची समस्या आपण टाळू शकता. (Winter Skin Care Tips)3 / 6हळद हे नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून काम करते. चेहऱ्यावरील काळेपणा दूर करायचा असेल तर थोडे बेसन पिठात हळद आणि दूध मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर फेस पॅकप्रमाणे लावा. 5-10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, नंतर पाण्याने धुवा. अशा प्रकारे चेहरा नेहमी उजळ राहील.4 / 6एलोवेरा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासोबतच ते मॉइश्चरायझिंगमध्येही मदत करतात. एलोवेरा जेलमध्ये बीटा कॅरोटीन असते जे त्वचेचा रंग हलका करते. गाभ्याचा बाहेरील भाग काढून चेहऱ्यावर नैसर्गिक जेल लावा. 10 मिनिटे पाण्याने चेहरा धुवा, त्वचा उजळते.5 / 6बटाट्याच्या रसामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर बटाटा किसून त्याचा रस काढा. हा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे त्वचेवर रस सोडा आणि नंतर पाण्याने धुवा. चेहऱ्याचा टॅनिंग निघून जाईल.6 / 6टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म त्वचेला तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी वापरले जातात. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोमॅटो कापून किंवा किसून चेहऱ्यावर चोळा. यानंतर, चेहरा 10 मिनिटे कोरडा होऊ द्या. त्वचा मॉइश्चरायझेशन होईल आणि चेहरा चमकेल. आणखी वाचा Subscribe to Notifications