Winter Hair Growth Tips : थंडीत केस रफ झालेत, हेअर फॉल वाढलाय? १ उपाय, केस कायम राहतील मऊ, दाट By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 1:29 PM 1 / 5वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेसह केसांवरही जाणवतो. थंडीत त्वचा कोरडी पडते केस खूप गळायला लागतात. कोरडे केस विंचरताना खूप त्रास होतो. (Hair Care Tips) महागडे प्रोडक्ट्स वापरून ही हवातसा ग्लो त्वचेवर येत नाही. काही घरगुती उपाय केसांचं होणारं नुकसान टाळू शकतात. (Hair fall control tips)2 / 5भोपळ्याच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात. (Pumkin Seed) यामुळे केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते आणि केसांची चमक परत येते. तसेच, जर तुम्हाला तुमच्या कोरड्या आणि निर्जीव केसांचा त्रास होत असेल तर भोपळ्याच्या बियांचा अवश्य वापर करा. (How to control hair fall)3 / 5जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर तुम्ही भोपळ्याच्या बिया वापरू शकता. हे केसांना झपाट्याने वाढण्यास आणि चमकदार बनविण्यास मदत करते. याचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता. यासोबतच याच्या बियांमध्ये आढळणारे घटक केसांना आतून पोषण देतात.4 / 5कोंडा ही केसांची सर्वात मोठी समस्या बनली आहे. एकदा कोंडा झाला की तो सहजासहजी जात नाही. त्यामुळे केस गळतीही होऊ शकते. त्यामुळे केस गळणे थांबवण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी भोपळ्याच्या बिया वापरा.5 / 5तुमचे केस कुरळे असतील तर ते तुटण्याची शक्यताही खूप जास्त असते. केसांना फाटे फुटले असतील आणि मुळापासून कमकुवत असल्यास ते तुमच्यासाठी हानिकारकच ठरते. कोरडेपणामुळे केस खूप तुटतात. त्यामुळे केसांमध्ये भोपळ्याच्या बिया वापरा. यामुळे केस सुंदर आणि आकर्षक दिसतील. आणखी वाचा Subscribe to Notifications