केस वाढतील भराभर, त्वचाही होईल सुंदर- तुकतुकीत, बघा कसा करायचा खोबरेल तेलाचा वापर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2024 5:53 PM 1 / 8२ सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड कोकोनट डे (World Coconut Day 2024) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आता खोबरेल तेलाचे त्वचेसाठी नेमके काय फायदे होतात ते पाहूया. 2 / 8बहुतांश लोक वर्षांनुवर्षांपासून खोबरेल तेल वापरतात. पण तरीही त्याचा केसांसाठी आणि त्वचेसाठी कसा फायदा होऊ शकतो, हे आपल्याला माहिती नसते. 3 / 8 म्हणूनच आता त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यापासून ते केस छान लांब वाढण्यापर्यंत वेगवेगळ्या सौंदर्योपचारांसाठी खोबरेल तेलाचा कसा वापर करायचा ते पाहा..4 / 8डोळ्यांभोवतीचे डार्क सर्कल्स काढून टाकण्यासाठी खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल एकत्र करा आणि डोळ्यांभोवती लावा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात. 5 / 8ओठ काळपट पडलेले असतील तर खोबरेल तेलामध्ये कॉफी मिक्स करा आणि त्याने ओठांना मसाज करा. दोन ते तीन मिनिटांनंतर ओठ धुवून टाका. नियमितपणे केल्यास ओठांना छान गुलाबी रंग येईल. 6 / 8केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्त्याची पावडर एकत्र करून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. केस छान वाढतील. 7 / 8मान, गळा काळपट झाला असेल तर खोबरेल तेलामध्ये लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण काळपट पडलेल्या मानेवर, गळ्यावर लावा. एक ते दोन मिनिटे मालिश करा. त्यानंतर धुवून टाका.8 / 8दातांना पिवळटपणा आला असेल तर खोबरेल तेल आणि लवंग पावडर एकत्र करून त्याने दात घासा. यामुळे दात पांढरेशुभ्र तर होतीलच. पण दातांची ठणक कमी करण्यासाठीही मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications