तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

Published:December 13, 2022 01:37 PM2022-12-13T13:37:54+5:302022-12-13T16:00:24+5:30

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

१. आजकाल पंचविशी- तिशीत असणाऱ्या तरुणींच्या चेहऱ्यावरही फाईन लाईन्स म्हणजेच बारीकशा सुरकुत्या (Home remedies for wrinkles free skin) दिसू लागल्या आहेत. खासकरून डोळ्यांच्या आसपासचा भाग आणि ओठांच्या दोन्ही बाजूला असणारा भाग, याठिकाणी तर जास्तच सुरकुत्या दिसतात.

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

२. या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेला टाईटनेस आणण्यासाठी आल्याचा वापर करून बघा. आल्याचा विशिष्ट पद्धतीने उपयोग केल्यास चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या दिसणे तर बंद होईलच पण वारंवार पिंपल्स येण्याचा त्रास असेल, तर तो ही कमी होईल.

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

३. स्वयंपाकाला चव आणण्यासाठी आपण आलं वापरतोच. शिवाय सर्दी- खोकला अशा काही आजारांवर आलं किती गुणकारी ठरतं याचाही अनुभव आपण घेतलेलाच आहे. आता सौंदर्य वाढविण्यासाठी आलं कशा पद्धतीने वापरायचं ते पाहूया..

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

४. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आलं, लिंबू आणि मध यांचा एकत्रित वापर करावा. यासाठी एक चमचा आल्याचा रस किंवा सुंठ पावडर घ्या. त्यात अर्धा चमचा मध आणि लिंबाचे ६ ते ७ थेंब टाका. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा या फेसपॅकचा वापर करावा.

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

५. सैलसर पडलेली त्वचा टाईट करण्यासाठी तसेच तिच्यावर ग्लो आणण्यासाठी आल्याचा रस, गुलाब जल आणि मध हे सगळं सम प्रमाणात घ्या आणि त्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. साधारण २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा तरुण आणि चमकदार दिसेल.

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

६. त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी १ चमचा बेसन, १ चमचा आल्याचा रस, १ चमचा दही आणि चिमुटभर हळद हे मिश्रण एकत्रित करून घ्या आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

७. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आल्याचा रस आणि मुलतानी माती एकत्रित करून लावलेला फेसपॅकही उत्तम ठरतो.