Join us   

केस गळणं १५ दिवसांतच कमी करणारी ५ योगासनं!! फक्त ५ मिनिटांचा वेळ द्या- केस गळणं बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 2:25 PM

1 / 8
केस खूप गळून पातळ झाले असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर इतर काही वरवरचे उपाय करण्यापेक्षा हा एक अस्सल उपाय करून पाहा.
2 / 8
तुमच्या केसांसाठी ५ मिनिटांचा वेळ काढा आणि ही काही योगासनं नियमितपणे करा. ही योगासनं केल्यामुळे डोक्याच्या भागाला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळणं नैसर्गिक पद्धतीनेच कमी होतं. त्यामुळे मग केसांची चांगली वाढ होऊन ते दाट दिसू लागतात.
3 / 8
ती योगासनं नेमकी कोणती याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ yoga.with.soniya या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलेली योगासनं प्रत्येकी एका मिनिटासाठी करावी. सुरुवातीला जमेल तसं काही सेकंद करून नंतर हा वेळ वाढवत न्यावा.
4 / 8
यामध्ये सांगण्यात आलेलं पहिलं आसन आहे शशांगासन. हे आसन केल्याने केसांची चांगली वाढ तर होतेच, पण चेहऱ्यावरही चांगला ग्लो येतो.
5 / 8
दुसरं आसन आहे पादहस्तासन. यामध्ये कंबरेतून खाली वाकून दोन्ही तळहातांनी पायांचे घोटे पकडा.
6 / 8
तिसरं आसन आहे पर्वतासन. पर्वतासन नियमितपणे केल्यास केसांसंबंधित अनेक समस्या कमी होतील. मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरतं.
7 / 8
चौथे आसन आहे उष्ट्रासन. उष्ट्रासन करणे पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते.
8 / 8
केसांच्या वाढीसाठी उत्तम असणारे आणखी एक आसन म्हणजे सर्वांगासन. तुम्हाला नियमितपणे योगा करण्याची सवय नसेल तर सर्वांगासन लगेच करणे जमणार नाही. पण काही दिवस सराव केल्यानंतर नक्कीच आसनस्थिती घेता येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीयोगासने प्रकार व फायदेव्यायाम