आलिया भटला का जिंकायची आहे स्वतःशी लावलेली पैंज? ती म्हणतेय.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 8:01 PM 1 / 72012मध्ये 'स्टुडण्ट ऑफ द इयर'मधल्या शनाया सिंघानियापासून आलिया भटनं सुरु केलेल्या भूमिकांचा प्रवास वीरा, काव्या, अनन्या, रुप , सहमत, गंगूबाई असा बहरत गेला.प्रत्येक भूमिका जणू काही आलियाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहीली गेली असावी अशा प्रकारे तिनं हलक्या फुलक्या व्यक्तिरेखांपासून गंभीर व्यक्तिरेखांपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला.2 / 7शनाया साकारताना बाॅलिवूडमध्ये नवख्या असलेल्या आलियानं एक एक भूमिका जगत आजच्या प्रगल्भ आणि यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास केला आहे. आलियाला काय जमेल अशी शंका घेतलेलेच गंगूबाई चित्रपटानं एकट्या आलियाच्या अभिनयाच्या जोरावर 100 कोटींचा व्यवसाय केला म्हणून तिचे कौतुक करत आहे.3 / 7आपल्यावर कोण टीका करतं, आपलं कोण कौतुक करतं यापेक्षा आपल्याला मिळालेली भूमिका आपण किती क्रिएटीव्हिटीनं करु शकतो याला आलिया जास्त महत्व देते.4 / 7आलिया म्हणते आपला स्वभाव स्पर्धकाचा आहे. आपण धावतो ते समोर बघून आणि न थांबता. पण चित्रपट म्हणजे रेस नाही. इथे आपल्याला कोणाच्याही पुढे जायचं नाही. आलिया म्हणते मी बाॅलिवूडमध्ये नंबर एकवर आहे की अकरावर हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. चित्रपटांमध्ये ताकदीच्या भूमिका करत बाॅलिवूडमध्ये टिकून राहाणं याला महत्व आहे.5 / 7चित्रपटात भूमिका करता येण्यापेक्षा जगता आल्या तर बाॅलिवूडमध्ये नाव कमावणं हे वयावर अवलंबून राहात नाही असं आलियाचं स्पष्ट मत आहे.6 / 7चित्रपटाला स्पर्धा न मानणारी आलिया इतर कोणाशी नाही तर स्वत:शीच स्पर्धा करते. आलिया म्हणते मला जर मोठं व्हायचं असेल तर माझी स्पर्धा इतरांशी नाहीतर स्वत:शीच असायला हवी. आलिया म्हणते स्पर्धा जेव्हा स्वत:शी असते तेव्हा ती रंगतदार होते.7 / 7आलियानं अभिनयाची उंची गाठण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी स्वत:शीच पैज लावलेली आहे. स्वत:शी लावलेली ही स्पर्धा जिंकण्यापेक्षाही आलियाला ती अर्थपूर्ण करायची आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications