केएल राहुलच्या लेकीचं नाव इवारा, विराटच्या वामिका! पाहा सुपरस्टार्सनी कशी निवडली मुलांची खास नावं
Updated:April 18, 2025 15:49 IST2025-04-18T15:31:56+5:302025-04-18T15:49:30+5:30
KL Rahul daughter name revealed: Celebrity baby names 2025: KL Rahul Athiya Shetty baby name: Unique and meaningful baby names of Indian celebrities: बॉलिवूड सेलिब्रिटीपासून ते क्रिकेट जगात अनेकांनी आपल्या आपल्या मुलांची नावे आगळी-वेगळी ठेवली

काही दिवसांपूर्वी के.एल.राहूल आणि आथिया शेट्टी यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या या खास क्षणी बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेट जगातील अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. (KL Rahul daughter name revealed)
अशातच के.एल. राहूल ने आपल्या मुलीचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. मुलींचे नाव ऐकून चाहत्यांनी कॉमेंट्स देखील केल्या आहेत. (Celebrity baby names 2025)
बॉलिवूड सेलिब्रिटीपासून ते क्रिकेट जगात अनेकांनी आपल्या मुलांची नावे आगळी-वेगळी ठेवली. अशाच काही स्टार किड्सच्या नावांवर एक नजर टाकूया... (Unique and meaningful baby names of Indian celebrities)
के.एल.राहूल आणि आथिया शेट्टी यांनी आपल्या मुलीचे नाव इवारा असे ठेवले. हे संस्कृत नाव असून त्याचा अर्थ देवाने दिलेलं गिफ्ट.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलांचे नाव अकाय तर मुलीचे वामिका ठेवले. अकायचा अर्थ निराकार तर वामिका म्हणजे देवी दुर्गा.
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी आपल्या मुलाचे नाव अहान ठेवले आहे. याचा अर्थ प्रकाशाची पहिली किरण. तर मुलगी समायराचा अर्थ सुंदर असा होतो.
दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांच्या मुलीचे नाव दुआ असे ठेवले आहे. हा पारसी शब्द असून आशीर्वाद असा त्याचा अर्थ होतो.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मुलीचे नाव राहा असे ठेवले. हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ दिव्य मार्ग असा होतो.
सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी आपल्या मुलाचे नाव वायु. हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ वारा किंवा वायुरुप असा होतो.