भयंकर घाणेरडं ट्रोलिंग होतं..! सारा अली खान म्हणाली, अत्यंत घाण बोलतात लोक, सहन करतो कारण..
Updated:April 4, 2025 14:29 IST2025-04-04T14:22:07+5:302025-04-04T14:29:14+5:30
It is a terrible dirty trolling..! Sara Ali Khan said, people talk very dirty, I tolerate it : सारा अली खानने सांगितले ट्रोलिंगचा किती त्रास होतो. लोकांचे बोलणे मनाला लागते.

नेपोकिड्सना ट्रोल करणं ही फारच कॉमन गोष्ट झाली आहे. ट्रोलिंग या विषयावर फार बोलताना सेलिब्रिटी दिसत नाहीत. मात्र टाइम्स नाऊ समीट २०२५ च्या मुलाखतीमध्ये सारा अली खानने मन मोकळेपणाने ट्रोलिंग बद्दल सांगितले.
सारा तिच्या अभिनय कौशल्यासाठी तसेच तिच्या कपड्यांसाठी इतरही अनेक गोष्टींसाठी सोशल मिडियावर फार ट्रोल होत असते. फक्त साराच नाही तर सगळेच सेलिब्रिटी ट्रोल होत असतात. मात्र काही जणांना या ट्रोलिंगचा जास्त सामना करावा लागतो.
सारा म्हणाली, "मला खुप ट्रोल करतात. माझ्याबद्दलच्या टिका टिपण्ण्या वाचल्यावर माझ्या आईला फार वाईट वाटते. ती उदास होते त्यामुळे मग तिला पाहून मला जास्त त्रास होतो. मी कुटुंबियांना दु:खी नाही पाहू शकत."
सारा म्हणाली, "तिला आयुष्यात फार कष्ट करावे लागले किंवा हालाखीचे दिवस काढावे लागले, स्ट्रगल करावं लागलं अस काही नाही. हे मला मान्य आहे. मात्र म्हणून माझ्या आयुष्याबद्दल बोलण्याचा अधिकार लोकांना मिळत नाही."
सेलिब्रिटींकडे बघताना लोक विसरून जातात की ती ही माणसेच आहेत. भावना त्यांनाही असतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सेलिब्रिटी बांधिल नाहीत. सारा म्हणाली,"आम्हाला आमचे पडद्या मागचेही आयुष्य आहे."
एखादी अभिनेत्री कसे कपडे घालते. कुठे जाते, काय करते या गोष्टींमध्ये लोकांना फारच रस असतो. पण तिने काय घालावे किंवा कुठे जावे हे ठरवायचा अधिकार लोकांना नाही. हे समाज विसरत चालला आहे. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य आहे.
एखाद्या व्यक्ती विषयी त्याच्या सोशल मिडियावरून किंवा करिअर वरून मत तयार करणे योग्य नाही. पुढे सारा म्हणाली, " मी मुळात व्यक्ती म्हणून कशी आहे, हे फक्त माझ्या आईला तसेच भावाला, परिवारातील लोकांना आणि माझ्या मित्रपरिवारालाच माहिती आहे. लोकांना ते माहिती नाही तरीही कमेंट करतात. या गोष्टीच मला फारच वाईट वाटते."
फार लहान सहान साधासुध्या गोष्टींसाठीही ट्रोल केले जाते. ते ऐकून माझ्या जवळच्या लोकांना दुःख होते. आणि त्यांना वाईट वाटल्यामुळे मला त्या गोष्टीचा फार त्रास होतो. आपल्यामुळे आईला त्रास झाल्याचे दुःख माझ्या मनात राहते असे साराने सांगितले.