अपमान सहन करण्यापेक्षा नातं तुटलेलं बरं कारण..! मलायका अरोराने सांगितलं प्रेम होतंच पण तरी..
Updated:April 8, 2025 19:38 IST2025-04-08T18:05:41+5:302025-04-08T19:38:09+5:30
It's better to break up than to endure insults because..! Malaika Arora said there was love but still : मलायकाच्या इंस्टाग्राम स्टोरीचा नक्की अर्थ काय? पाहा काय म्हणाली मलायका.

मलायका अरोरा ही एक नावाजलेली अभिनेत्री व डान्सर आहे. मलायका तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. पन्नाशी झाली तरी ती सुंदर आणि फीट आहे.
२०१८ मध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी मिडियावर त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले. तेव्हापासूनच ही जोडी कायम चर्चेत होती. गेल्याच वर्षी त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी असल्याने त्यांचे नाते सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल झाले होते. मलायका व अरबाज खानच्या घटस्फोटावेळीही मलायका फार ट्रोल झाली होती.
मात्र सध्या चर्चेत आहे मलायकाची एक इंस्टाग्राम स्टोरी. ज्यावर तिने काही अशा वाक्यांचा वापर केला आहे, ज्यामुळे अर्जुन कपूरचे वागणे कसे होते? हा प्रश्न लोकांना पडला आहे.
मलायकाने लिहीले होते की, वय वाढले की आरडाओरडा नको वाटतो. शांतता हवीहवीशी वाटते. अपमाना सहन करण्यापेक्षा नात्यामध्ये अंतर असलेले कधीही चांगले. ड्रामा नको वाटायला लागला आहे. ड्राम्यापेक्षा शांत जीवन व्यतीत करण्याला प्राधान्य द्यावे असे मलायका वाटते.
मलायकाला आता आजूबाजूला तिची जवळीच माणसं हवी आहेत. ज्या माणसांमुळे तिला मानसिक त्रास होईल अशी लोक आयुष्यात नको असे मलायका म्हणते. ज्यांच्यामुळे स्वास्थ्य खराब होईल असे लोक आयुष्यात नका ठेऊ असे ही ती म्हणाली.
मलायकाच्या या पोस्टनंतर ती प्रचंड चर्चेत आली. नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला ट्रोलही केले आणि तिचे सांत्वनही केले. मलायका अजूनही तरुण मुलामुलींसारखा ड्रामा करते, असे काही जण म्हणाले तर काहींनी तिला स्ट्रॉग म्हटले.
ब्रेकअपनंतर अर्जुन कपुर व मलायका त्यांच्या नात्याबद्दल बोलताना कधी दिसले नाहीत. मात्र एका वर्षानंतर टाकलेली ही मलायकाची पोस्ट नक्की कोणासाठी होती? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.