बधाई हो...प्रियांका चोप्राकडे गुड न्यूज! प्रीती झिंटा -एकता कपूरप्रमाणे प्रियंकानेही स्वीकारले सरोगसी मातृत्व..पाहा फोटो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 12:50 PM 1 / 7१. प्रिती झिंटानेही नुकतीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रिती वयाच्या ४६ व्या वर्षी सरोगसी पद्धतीने आई झाली. सरोगसीद्वारे तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली.2 / 7२. २०१९ साली एकता कपूरने सरोगसीद्वारे आई होण्याचे ठरवले. ती सिंगल मदर असून तिला सरोगसीद्वारे एक गोड मुलगा झाला आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवून तिचा भाऊ अभिनेता तुषार कपूर यानेही सरोगसीद्वारे पिता होण्याचे सुख मिळवले. 3 / 7३. बॉलीवूडची स्टायलिश, हॉट आणि बोल्ड अभिनेत्री लिसा रे ही देखील २०१८ साली सरोगसी द्वारे आई झाली. तिला जुळी अपत्ये आहे. 4 / 7४. सनी लियोन आणि तिचा नवरा डॅनिअल वेबर यांनी २०१८ साली सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. नोह आणि अशेर अशी तिच्या मुलांची नावे असून तिने एका मुलीला दत्तकही घेतले आहे. निशा असं तिच्या दत्तक मुलीचं नाव आहे. 5 / 7५. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना एक मुलगा आणि एक मुलगी. यापैकी शिल्पाच्या मुलीचा जन्म २०२० साली सरोगसीद्वारे झाला आहे.6 / 7६. किंग खान म्हणजेच शाहरूख खान आणि गौरी खान यांनाही २०१३ साली सरोगसी पद्धतीने मुलगा झाला. अबराम असं त्याचं नाव असून असं म्हणतात की गौरीच्या बहिणीनेच त्याला सरोगसी पद्धतीने जन्म दिला. 7 / 7७. अभिनेता अमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनीही २०११ साली सरोगसी पद्धतीने मुलाला जन्म दिला. आझाद असं त्यांच्या या मुलाचं नाव. आणखी वाचा Subscribe to Notifications