1 / 10२०१५ मध्ये आमिर खानचा दंगल हा चित्रपट फार गाजला. लोकांना कथा, कथानक, कलाकार सगळंच आवडलं होतं. त्या चित्रपटात फातिमा सना शेख हिने गीताची भूमिका केली होती. नंतर फातिमा सतत चर्चेत होती. का तर म्हणे तिचं आमिर खानशी अफेअर असल्याची चर्चा!2 / 10खरंच त्यांचं अफेअर होतं का? ते लग्न करणार होते का? आमिरची आता नवीनच मैत्रीण आहे, ही सगळी गॉसिप चर्चा बाजूला ठेवू. पण फातिमासाठी मात्र तो काळ फार अवघड असल्याचे ती सांगते. कॉमेडियन भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये फातिमाची मुलाखत झाली त्यात ती आपला बाल कलाकार ते दंगल हा प्रवास सांगते.3 / 10फातिमा या आधीही एका सुपरहीट चित्रपटाचा भाग होती आणि त्या चित्रपटातही आमिर खान होता. आमिर खान व जुही चावलाची जोडी या चित्रपटामुळे भरपूर गाजली होती. चित्रपटाचे नाव इश्क असे आहे. या चित्रपटामध्ये काजोल व अजय देवगणही आहेत. 4 / 10इश्कमध्ये एका सीनदरम्यान फातिमा काजोलच्या कडेवर बसली होती. असे तिने सांगितल्यावर इश्क चित्रपट पुन्हा चर्चेत आला. तेव्हा तिने आमिर खान बरोबर प्रथम काम केले होते. असे फातिमा म्हणाली.5 / 10फातिमाने बाल कलाकार म्हणून आपला प्रवास सुरु केला. चाची ४२० सिनेमातली गोड छोटीशी मुलगी तर सगळ्यांनाच आवडली होती. याशिवाय बडे दिलवाला, वन टू का फोर, खुबसूरत या सिनेमातही तिनं काम केलं. 6 / 10भारतीशी गप्पा मारताना फातिमा म्हणाली की खरंतर आमिर खानसोबत पहिल्यांदा काम इश्क या सिनेमात केलं. काजोलला पाहून वेडा होत अजय देवगण पाइपवरुन चालत जातो या गाजलेल्या सीनमध्ये काजोलच्या कडेवर असलेली एक लहानशी मुलगी मीच होते असं तिने सांगितलं. लोकांनी तो सिन आणि फोटो शोधून काढले.7 / 10दंगलनंतर ठग्ज ऑफ हिंदूस्तान या चित्रपटातही आमिर व सना एकत्र दिसले. तेव्हा सना शेखला आमिर खानमुळे चित्रपट मिळाला अशी चर्चा झाली, त्यांचं अफेअर असल्याचंही बोललं गेलं. तेव्हा मात्र ती यासंदर्भात काही बोलली नाही, ना तिनं कसले खुलासे दिले.8 / 10आमिर खान व किरण रावच्या घटस्फोटादरम्यान सना व आमिर रीलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. दंगलपासून फातिमा व आमिर सारखे एकत्र का दिसतात या प्रश्नाचे शेवटी रोख उत्तर फातिमाने दिलेच.9 / 10मात्र आता तिने भारतीशी बोलता बोलता सांगितले की लोक तुमच्याविषयी घाण घाण बोलतात. अफवा पसरवतात. ज्या माणसांना मी कधी भेटले नाही, साधी ओळख नाही ते माझ्याविषयी वाट्टेल ते बोलले. लिहित सुटले. वाईट वाटतंच, त्रास होतो. पण सोडून द्यावंच लागतं शेवटी. कुणाकुणाला नी काय काय सांगणार?10 / 10आमिर खानबद्दल सांगताना फातिमाने त्याच्या स्वभावाचे कौतुकच केले करत एक कलाकार म्हणून आमिर किती चांगला आहे ते फातिमाने सांगितले. आमिरकडून तिला बरेच काही शिकायला मिळाले असे ती म्हणाली.