कधीतरी डाएट मोडून चिट मिल म्हणून काय खातात दीपिका - आलिया आणि कतरिना, पाहा पदार्थांची यादी.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 6:04 PM 1 / 13बॉलिवूड मधील हिरो, हिरोइन्स आपल्या अभिनय कौशल्यांची जितकी काळजी घेतात त्याचप्रमाणे ते आपल्या फिटनेस आणि फिगरची देखील तितकीच काळजी घेतात. सिक्स पॅक्स आणि झिरो फिगर शिवाय कोणी आपल्याला हिरो, हिरोइन्स बोलणारच नाहीत म्हणूनच की काय ते आपले डाएट नियमित पाळताना दिसतात. परंतु कितीही झाले तरी ती देखील आपल्यासारखी माणसचं आहेत त्यांनासुद्धा या रोजच्या रुटीनचा कधी ना कधी कंटाळा येतच असणार. आठवड्यातील ६ दिवस न थकता व्यायाम केला, डाएट काटेकोरपणे पाळले की एक दिवस तरी... चिट डे तो... बनता है बॉस...!!! आपल्यापैकी काहीजण असे आहेत की, जे आठवड्यातून येणाऱ्या चिट डे ची आवर्जून वाट बघत असतात. चिट डेच्या दिवशी आपल्या आवडीच्या पदार्थांवर आडवा हात मारतात.आपल्याप्रमाणेच बॉलिवूडमधील काही खास अभिनेत्री आपल्या चिट डेच्या दिवशी काय खातात जाऊन हे समजून घेऊयात(Bollywood Celebrities & Their Favorite Cheat Meals). 2 / 13चिट डे म्हणजे तुमच्या डाएट प्लॅन मधला असा एक दिवस की जेव्हा आपण आपले स्ट्रिक्ट डाएट सोडून आपल्याला हवं ते खाऊ शकतो. पण या चिट डेचा एक नियम आहे, कोणताही डाएट करणारा व्यक्ती जेव्हा उर्वरित ६ दिवस त्याचे डाएट अगदी व्यवस्थित काटेकोरपणे पाळतो तोच व्यक्ती आठवड्यातून एकदा चिट डे करू शकतो. 3 / 13दीपिका पदुकोण ही तिच्या फिटनेस आणि टोन्ड बॉडी फिगरमुळे कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. दीपिकाला गोड खायला भरपूर आवडते. तिच्या चिट डेच्या दिवशी ती केक, ब्राऊनी, कुकीज खाणं पसंत करते. 4 / 13प्रियांका चोप्राला बर्गर, हॉट चॉकलेट फज, जिलेबी आणि डेझर्ट म्हणून रेड व्हेलव्हेट केक खायला फार आवडते. प्रियांका मुळातच पंजाबी घराण्यातली असल्यामुळे तिच्या चिट डेच्या दिवशी ती काही पंजाबी पदार्थसुद्धा आवर्जून खाते.5 / 13आलिया भट फ्रेंच फ्राईज खाऊन आपला चिट डे साजरा करते. 6 / 13आपल्या झिरो फिगरमुळे सर्वत्र प्रसिद्धी मिळविलेल्या करीनाला सुद्धा चिट डे फार प्रिय आहे. करीना कपूर खाण्याच्या बाबतीत खूप फुडी असल्याकारणाने तिला वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खायला आवडतात. 7 / 13 कतरीना कैफला चिट मिल म्हणून पॅनकेक खायला भरपूर आवडतात. तिला दिवसभर जरी पॅनकेक खायला लावले तरी ती ते खाऊ शकते, असं तिचं म्हणणं आहे. 8 / 13 मलायका आपल्या फिटनेस आणि फिगरच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट असल्याचे जाणवते. जिम मध्ये व्यायाम करतानाचे कित्येक व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. मलायका अरोराला चिट मिल म्हणून नॉनव्हेज स्पॅगेटी सोबत मीटबॉल्स खायला आवडते. 9 / 13साराच्या म्हणण्यानुसार तिचे वजन लगेच वाढते म्हणून ती सहसा चिट डे न पाळता तिचे स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणेच पसंत करते. पिझ्झा व चॉकलेट हे तिचे चिट मिल आहे जे ती फारच क्वचितच खाते. 10 / 13श्रद्धा कपूर ही अस्सल मुंबईकर असल्याने तिला महाराष्ट्रीयन पद्धतीचे तळलेले मासे आणि स्ट्रीट फूडमध्ये मुंबईचा वडापाव खायला भरपूर आवडते. 11 / 13 योगा करून कायम फिट राहणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिलासुद्धा चिट डे चा मोह आवरला नाही. रविवार हा तिचा चिट डे असतो. ती या दिवसाची आतुरतेने वाट बघत असते. शिल्पाला कॉफी फ्लेवर्डचे इटालियन डेझर्ट - तिरामीसू (Tiramisu), रसगुल्ला आणि चीजकेक खायला आवडतो. 12 / 13जॅकलीनला शुगर - फ्री, ग्लूटेन - फ्री चॉकलेट केक चिट मिल म्हणून खायला आवडतो. 13 / 13 सोनम कपूर क्वचितच चिट डे फॉलो करते. सामोसा, डोसा आणि रिच वॉलनट केक हे तिचे आवडते पदार्थ आहेत. जेव्हा ती चिट डे फॉलो करते तेव्हा ती हे सगळे पदार्थ आवर्जून खाते. आणखी वाचा Subscribe to Notifications