चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 5:56 PM 1 / 8दिवाळीनिमित्त सध्या दागदागिन्यांचे अनेक नवनविन प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. तुम्हाला दिवाळीनिमित्त चांदीच्या जोडव्यांची खरेदी करायची असेल तर हे काही एकपेक्षा एक सुंदर नव्या स्टाईलचे फॅशनेबल डिझाईन्स पाहून घ्या....2 / 8मोरपीसाचं डिझाईन असणारी ही जोडवी पायात घातली तर पाय नक्कीच आणखी सुंदर दिसतील.3 / 8नुसतं मोरपीस नको असेल तर हे छानसं डिझाईन बघा... यात पिसारा फुलवून नाचणारा मोर अतिशय सुंदर पद्धतीने कोरला आहे4 / 8कमळ असणारं हे एक डिझाईनही पायात घातल्यावर खूप सुंदर दिसेल.5 / 8सणासुदीच्या निमित्ताने अनेकजणी ठसठशीत दागिने घालतात. दिवाळीला साडी, नऊवारी नेसून पारंपरिक थाट करायचा असेल तर हे ठसठशीत जोडवे घ्या. सणावाराला, लग्नकार्यात असे जोडवे खूपच उठून दिसतील.6 / 8ही नव्या पद्धतीची क्रिस्टल्स लावलेली जोडवी सध्या खूप ट्रेण्डिंग आहेत. 7 / 8क्रिस्टल्स किंवा खडे असणाऱ्या जोडव्यांचं हे आणखी एक डिझाईन पाहून घ्या...8 / 8खूप वेगवेगळे नाजूक खडे जडवलेले हे जोडवेही अतिशय सुंदर असून त्यावरचं काम अतिशय सुबक आहे. यातही अनेक वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications