1 / 8संक्रांतीचा सण म्हणजे काळ्या रंगाच्या साड्यांचे विशेष महत्त्व. एरवी वर्षभर आपण काळी साडी घेत नाही. पण संक्रांतीच्या निमित्ताने मात्र हमखास काळी साडी घेतलीच जाते. बघा या काही सुंदर रेशमी काळ्या साड्यांचे प्रकार...2 / 8काळ्या पैठणीला तर चंद्रकळा असं सुंदर नाव दिलेलं आहे. महाराष्ट्रीयन महिलांचं पैठणी प्रेम तर विचारायलाच नको. एरवी वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी तर आपण घेतोच पण अशी एखादी चंद्रकळाही आपल्याकडे असावी...नाही का3 / 8कॉटन इरकल, सिल्क इरकल या साड्या खूप ट्रेण्डिंग आहे. यात काळा रंग घेतला आणि त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घातली तर नक्कीच चारचौघीत तुमची साडी उठून दिसेल. 4 / 8प्लेन काळी नारायणपेठ आणि तिला असे गडद चमकदार रंगाचे काठ अशी साडीही खूप शोभून दिसते. नारायणपेठचे काठच मुळात चमकदार असल्याने काळ्या साडीला उठाव मिळतोच.5 / 8काळ्या रंगाची बनारसीही कधीतरी एखाद्या संक्रांतीला घेऊन पाहायला हरकत नाही.6 / 8कांजीवरम साडी वेगवेगळ्या रंगात आपण नेहमीच घेतो. आता या संक्रांतीला किंवा पुढच्या संक्रांतीला अशी एखादी काळी किंवा ग्रे रंगातली कांजीवरम घेऊन पाहा. 7 / 8चंदेरी प्रकारातली एखादी हलकी- फुलकी काळी साडीही छान दिसते. तिच्यावरच्या दागिन्यांची रंगसंगती जमली की ती साडी खूप छान पार्टीवेअर लूकही देते.8 / 8गढवाल सिल्क प्रकारातल्या काळ्या साड्याही संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणावर येतात. ते प्रकार एवढे सुंदर दिसतात की त्यातली एखादी काळी साडीही आपल्या कलेक्शनमध्ये असावीच असे वाटते.