उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

Updated:April 13, 2025 18:41 IST2025-04-13T18:30:37+5:302025-04-13T18:41:32+5:30

8 Easy Tips To Take Care Of Your Cotton Clothes : How To Take Care of Your Cotton Clothes : How can we take care of cotton clothes : How to Wash and Care for Cotton Clothes : उन्हाळ्यात कॉटनचे कपडे वारंवार वापरल्याने खराब दिसतात, मग लक्षात ठेवा या ८ गोष्टी...

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

उन्हाळ्यात आपण शक्यतो कॉटनचेच (8 Easy Tips To Take Care Of Your Cotton Clothes) कपडे घालणे पसंत करतो. रणरणत्या उन्हामुळे आणि वाढत्या ( How To Take Care of Your Cotton Clothes) उष्णतेमुळे अंगाला सतत घाम येतो, कॉटनचे कपडे हा घाम शोषून घेतात. यामुळेच उन्हाळ्यात कॉटन फॅब्रिकच्या कपड्यांना फार मोठ्या प्रमाणांत मागणी असते.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

या दिवसांत सतत कॉटनचे कपडे वापरल्याने (How can we take care of cotton clothes) ते कालांतराने जुनेपुराणे दिसू लागतात. अशावेळी हे कॉटनचे कपडे (How to Wash and Care for Cotton Clothes) वापरणे नकोसे वाटते. परंतु जर तुम्हाला तुमच्या कॉटनच्या कपड्यांची चमक आहे तशीच ठेवायची असेल तर त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

१. कॉटनचे कपडे घालण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. उन्हाळ्यात सतत अंगाला येणारा घाम शोषून कॉटनचे कपडे तुम्हांला कम्फर्टेबल लूक देण्यास अधिक जास्त फायदेशीर ठरतात.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

२. कॉटनच्या कपड्यांची चमक जशीच्या तशी राहण्यासाठी ते हाताने धुणे कधीही उत्तम. जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कॉटनचे कपडे धूत असाल तर ते इतर कपड्यांपेक्षा वेगळे करून धुवा. तसेच धुण्यापूर्वी कपडे उलटे म्हणजेच आतील बाजू बाहेर काढून मगच धुवा. दुसऱ्या कपड्यांचा रंग त्यांना लागणार नाही याची काळजी घ्या.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

३. कॉटनचे कपडे धुतल्यानंतर ते संपूर्णपणे कोरडे होईपर्यंत व्यवस्थित वाळवून घ्यावे. ते थोडे जरी ओले राहिले तर त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

४. आपल्या कॉटनच्या कपड्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी ड्राय क्लिनिंग हा एक चांगला पर्याय आहे, परंतु प्रत्येकवेळी आपण ते करू शकत नाही. म्हणून, कॉटनचे कपडे घरी काळजीपूर्वक धुवा आणि त्यांना व्यवस्थित इस्त्री करून कपाटांत घडी करून ठेवून द्या.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

५. कॉटनचे कपडे धुण्यासाठी ब्लीचचा वापर चुकूनही करु नका. ब्लीचमुळे सुती कपड्यांचा रंग फिका पडू शकतो. सौम्य डिटर्जंटचा वापर करावा.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

६. कॉटनच्या कपड्यांवर परफ्युम, डिओड्रंटचे डाग पडतात. त्यामुळे शक्यतो कॉटनच्या कपड्यांवर परफ्युम, डिओड्रंट स्प्रे करणे टाळा.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

७. कॉटनच्या कपड्यांना इस्त्री करताना तापमान योग्य आणि कपड्यांना सोसवेल असेच ठेवा. गरजेपेक्षा अधिक जास्त गरम इस्त्रीचा वापर करु नका.

उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरुन जुनेपुराणे दिसतात? ८ टिप्स - अनेकदा वापरुनही दिसतील नव्यासारखे...

८. कॉटनच्या कपड्यांसाठी स्टार्चचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला ते एखाद्या खास प्रसंगी घालायचे असतात. कारण स्टार्च कॉटनच्या कापडाला कुरकुरीत बनवतो परंतु सततच्या वापराने कॉटनचे कपडे खराब होऊ शकतात.