नेहमीच्या साडीला द्या स्टाइलिश लूक, छोटासा बदल आणि बघा साडी ड्रेपिंगचे 9 स्पेशल लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 7:15 PM 1 / 9१. साडी एकच पण ती किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण नेसतो, किंवा त्यावर कसं ब्लाऊज घालतो यानुसार त्या साडीचा लूक बदलत जातो.. म्हणूनच तर बघा साडी नेसण्याच्या काही हटके स्टाईल...2 / 9२. अभिनेत्री सोनम कपूरचा हा साडी नेसण्याचा अंदाज निश्चितच वेगळा आहे. साडीवरचं ब्लाऊज नेहमीपेक्षा लाँग असून साडीचा पदर तिने ओढणीप्रमाणे घेऊन एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर टाकला आहे..3 / 9३. साडी विथ लाँग श्रग ही शिल्पा शेट्टीची स्टाईलही छान आहे. एखाद्या पार्टीसाठी असा लूक करायला हरकत नाही.. श्रग मात्र साडीच्या काठाशी आणि पदराशी मॅचिंग असावे.4 / 9 ४. सध्या अशा पद्धतीच्या केपची खूप फॅशन आहे. अशी स्टाईल करायची असेल तर तुम्ही एकतर ब्लाऊज केपचे शिवून घेऊ शकता किंवा रेडीमेड केप साडीवर घालू शकता.5 / 9५. साडी आणि बेल्ट हे कॉम्बिनेशनही सध्या खूप ट्रेण्डी आहे. पारंपरिक किंवा पार्टीवेअर अशा दोन्ही प्रसंगांसाठी तुम्ही साडी विथ बेल्ट स्टाईल करू शकता.6 / 9६. साडी नेसण्याची ही पद्धतही खूप अनोखी आहे. या प्रत्येक स्टाईलमध्ये साडीचा पदर अशा पद्धतीने घेण्यात आला आहे की बघणाऱ्याला जणू काही तो साडीचा पदर नसून स्टोल आहे, असे वाटते. पार्टी, रिसेप्शन यासाठी हा लूक आयकॅची ठरू शकतो.7 / 9७. दोन साड्यांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने घागरा साडीही नेसू शकता. ट्रॅडिशनल ते वेस्टर्न असा जो पाहिजे तो लूक या स्टाईलमध्ये मिळवता येतो. 8 / 98. बेल्ट प्रमाणेच साडी विथ पॅण्ट असा ट्रेण्डही सध्या चालू आहे. यामध्ये तुम्ही लेगिंग्स, जिगिंग्स, जीन्स यांचा वापर करून साडी नेसू शकता. त्याचप्रमाणे आता धोती साडीचाही ट्रेण्ड आहे. पॅन्टवरच ही साडी नेसण्यात येते. फक्त त्यामध्ये मागच्या बाजूने साडी अशा पद्धतीने खोचतात की त्यामुळे धोती नेसल्याचा फिल येतो.9 / 9९. अमृता खानविलकरचा हा लूकही अतिशय स्टनिंग आहे.. पदर घेण्याची स्टाईल बदलली तर कोणीही असा लूक सहज करू शकेल. आणखी वाचा Subscribe to Notifications