1 / 8तेच तेच कपडे वापरून कंटाळा येत असेल तर काही तरी वेगळं ट्राय करा. बऱ्याच पॅटर्नचे कपडे आता उपलब्ध असतात. त्यापैकीच एक हटके असा पॅटर्न म्हणजे थ्री पीस सेट.2 / 8बऱ्याच विविध प्रकारचे थ्री पिस पॅटर्न मिळतात. त्यापैकी काही ऑफीससाठी वापरायला अगदी मस्त आहेत. तसेच फिरायला जाताना किंवा कार्यक्रमाला जातानाही वापरु शकता. 3 / 8हा प्रकार कम्फर्टेबल आहे, दिसतो छान तसेच विविध फंक्शन्ससाठी वेगवेगळे पॅटर्न मिळतात. फार महागही नाही सगळीकडे आरामात उपलब्ध आहे. 4 / 8ऑफीसला जाणाऱ्यांसाठी हा पॅटर्न अगदीच मस्तच आहे. रीच लूक या थ्री पिसला आहे. तसेच या पॅटर्नमध्ये रंगही छान उपलब्ध आहेत. जॅकेट टॉप व पॅन्टचा हा सेट फार कम्फर्टेबल आहे.5 / 8थोड्या फंक्शनल लूकसाठी असा थ्री पिस नक्कीच सुंदर दिसेल. कॉटनची पॅन्ट व शॉर्ट टॉपवर जाळीचे जॅकेट सुंदर दिसते.6 / 8ऑफीस पार्टी किंवा डेलीसाठी असा वन कलर सुट नक्कीच छान वाटेल. मस्त बॉसी लूक देणारा हा प्रकार विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. 7 / 8जरा हटके काही प्रकार वापरायचा असेल तर त्यासाठी हा असा ड्रेस कम क्रॉपटॉप सेट दिसायला फारच छान आहे. 8 / 8कॉटनचा थ्री पिस वापरायला अगदीच कम्फर्टेबल आहे. कॉन्ट्रास मॅचिंग असलेला हा सुट दिसेल तर सुंदरच पण त्वचेला त्याचा फिलही फार छान येईल.