'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

Updated:February 8, 2025 18:15 IST2025-02-08T13:51:38+5:302025-02-08T18:15:56+5:30

Angrakha Blouse Design : Latest Angrakha Pattern Blouse Design : Angrakha Blouse For Women Latest Design : Angrakha Blouse : 'अंगरखा' पॅटर्नच्या ब्लाऊजचे खास ९ ट्रेंडी प्रकार....

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

साडीवर आपण वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवतो. यातही आपण ट्रेंडनुसार ब्लाऊज पॅटर्न शिवणे अधिक पसंत करतो. सध्या अंगरखा पॅटर्नच्या (Angrakha Blouse Design) ब्लाऊजची एक अनोखी फॅशन पहायला मिळते. अंगरखा पॅटर्न हे जरी दिसायला व्ही - नेकलाईन सारखेच असले, तरीही यामध्ये कापड एका बाजूने दुसरीकडे जाते आणि नंतर बटण, स्ट्रिंग किंवा फॅब्रिकच्या मदतीने ते बंद केले जाते. मॉर्डन प्रकारच्या पोशाखांमध्ये या प्रकारच्या नेकलाइनला 'रॅप नेकलाइन' असे म्हणतात आणि एथनिक पोशाखांमध्ये या प्रकारच्या नेकलाइनला 'अंगरखा पॅटर्न' म्हणतात.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

'अंगरखा' पॅटर्नचे ट्रेंडी (Latest Angrakha Pattern Blouse Design) ब्लाऊज शिवायचे असतील तर त्याचे वेगवेगळे पॅटर्न कोणते आहेत किंवा कोणत्या प्रकारचे कापड वापरुन आपण हे पॅटर्न शिवू ( Angrakha Blouse For Women Latest Design) शकतो ते पाहूयात.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

या डिझाइनमध्ये, ब्लाऊजच्या पुढच्या भागात बाजूला एक दोरी असते. चांगल्या फिटिंग आणि डिझाइनसाठी तुम्ही त्यावर बटणे देखील लावू शकता. या प्रकारच्या ब्लाऊजमध्ये प्लंजिंग आणि गोल आकाराच्या नेकलाइन्स छान दिसतात. या प्रकारच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही साडीचा पदर ब्लाऊजच्या आतून काढून खांद्यावर घेऊ शकता.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

आपण सिल्क कापडाचे देखील अंगरखा ब्लाऊज शिवू शकतो. जर तुम्ही लग्न किंवा सणासारख्या खास प्रसंगासाठी ब्लाऊज घेत असाल तर सिल्क फॅब्रिक हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सिल्क कापडाचा अंगरखा ब्लाऊज आपल्याला एकदम हटके आणि शाही लूक देऊ शकतो.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

जर तुम्हाला बोल्ड आणि स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही अंगरखा ब्लाऊज डीप व्ही-नेक डिझाइनमध्ये शिवू शकता.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

जर तुम्हाला ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी अंगरखा पॅटर्नचे ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही कॉटन फॅब्रिकची निवड करु शकता. कॉटन फॅब्रिक मधील अंगरखा ब्लाऊज आरामदायी आणि उन्हाळ्यातही तुम्हाला स्टायलिश लूक देते.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

जर तुम्ही लांब उंचीचे ब्लाऊज घालणे पसंत करत असाल तर अंगरखा पॅटर्नमध्ये थोडा उंचीला लांब असा ब्लाऊज शिवू शकता. या डिझाइनमुळे अनारकली लूक मिळतो आणि साडी व्यतिरिक्त, तुम्ही हे ब्लाऊज प्लाझो आणि स्कर्टसोबत देखील घालू शकता.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

साडी नेसल्यावर फ्लॉलेस किंवा मस्त पार्टीवेअर लूक हवा असेल तर आपण शिफॉन आणि जॉर्जेट फॅब्रिक पासून तयार केलेल्या अंगरखा ब्लाऊजची निवड करु शकता.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

अंगरखा ब्लाऊज पॅटर्नमध्ये आपण बिना बाह्यांचे स्लिव्हलेस ब्लाऊज देखील घालू शकता. उन्हाळ्यात हलका आणि आरामदायी लूक हवा असेल तर तुम्ही अंगरखा पॅटर्न ब्लाऊजमध्ये स्लीव्हलेस किंवा स्लिट कट स्लीव्ह डिझाइन निवडू शकता.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

जर तुम्हाला अंगरखा पॅटर्नचा ब्लाऊज हेवी वेडिंग लूक किंवा काही खास फंक्शनसाठी हवा असेल तर आपण वेलवेट आणि नेट फॅब्रिक्सचा वापर करुन अंगरखा ब्लाऊज शिवू शकता. अशाप्रकारचे फॅब्रिक्स तुम्हाला शाही आणि स्टायलिश लूक देतील.

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून

अंगरखा पॅटर्न ब्लाऊजमध्ये आपण गळ्याभोवती एम्ब्रॉयडरी असलेल्या नाजूक किंवा हेव्ही पॅटर्नच्या ब्लाऊजची निवड करु शकता. लग्न, सणवार किंवा खास प्रसंगांसाठी आपण हँडवर्क , ​​गोटा पट्टी किंवा जरी वर्कने सजवलेल्या अंगरखा ब्लाऊजची निवड करु शकता.