Join us   

व्हाट झुमका! दांडिया-गरब्यात उठून दिसायचं तर हे घ्या ट्रेण्डी इअररिंग्ज, दिसाल अतिशय सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 12:05 PM

1 / 10
१५ ऑक्टोबरपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळेल. या उत्सवादरम्यान ठिकठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण नऊ दिवसांचे-नऊ रंगाचे पोशाख परिधान करून गरबा खेळतात. गरबा आणि दांडिया नाइट्ससाठी लोक वेगवेगळे लूक ट्राय करतात. मुख्य म्हणजे महिलावर्ग ट्रेडीशनल लूक कॅरी करायला प्राधान्य देतात(Authentic Indian Earrings for Navratri Outfits).
2 / 10
घागरा-चोळीमध्ये महिला सुरेख दिसतात. पोशाखामुळे सौंदर्य तर वाढतेच, शिवाय ज्वेलरीमुळेही पोशाखाची शोभा वाढते. जर आपल्यालाही सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर, ऑक्साईड इअररिंग्स, झुमके आणी रिंगा ट्राय करून पाहा. या कानातल्या डिझाईन्समुळे आपल्या सौंदर्यात आणखी विशेष भर पडेल.
3 / 10
सध्या ऑक्साईड ज्वेलरीचा ट्रेण्ड सुरु आहे. ऑक्साईड इअररिंग्स प्रत्येक पोशाखात सूट करतात. कुर्ता, घागरा-चोळी किंवा पंजाबी ड्रेस, प्रत्येक ट्रेडीशनल वेअरमध्ये ऑक्साईड इअररिंग्स शोभून दिसतील. सध्या लॉन्ग आणि हेवी कानातले घालण्याची फॅशन सुरू आहे. अशा ड्रेसवर भरगच्च स्टाईलचे झुमके उठून दिसतील.
4 / 10
जर आपण रेग्युलर कुर्ता, स्कर्ट किंवा लॉन्ग श्रग परिधान करणार असला तर, नाजूक लहान ऑक्साईड इअररिंग्स ट्राय करा. हे इअररिंग्स दिसायला छोटे, वजनाला हलके असतात. यामुळे आपल्याला सिंपल पण छान-सुंदर लूक मिळेल.
5 / 10
मुलींची पहिली पसंती झुमक्याकडे वळते. झुमका हा लोंबता व झुलणारा दागिना आहे. झुमक्यावर अनेक गाणी तयार झाली आहेत. झुमका हा गोलाकार असतो व झुमक्याला खाली नाजूक मणी असतात. बाजारात झुमक्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील.
6 / 10
या नवरात्रीत आपण मोत्याचे, सोन्याचे, चांदीचे, रंगीबेरंगी खड्यांचे झुमके घालू शकता. जर आपण घागरा-चोळी परिधान करणार आहात तर, मोठे लोंबणारे झुमके घाला. जर आपण ड्रेस किंवा कुर्ता घालणार असाल तर, रंगीबेरंगी मोत्यांचे झुमके घाला.
7 / 10
सध्या सर्वत्र कुंदन झुमक्यांचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. हे झुमके वजनाला हलके असतात. व झुमक्यातील कोरीव काम आपल्याला नक्की आवडेल.
8 / 10
कानातल्या रिंगांची फॅशन तशी जुनीच आहे. रिंगा या आकाराने गोल असतात. त्याच्या खाली लोंबणारे डिझाईन्स असतात. जे दिसायला फार आकर्षक आणि सुंदर दिसतात.
9 / 10
आपण या नवरात्रीत जर कुर्ता, ड्रेस किंवा जीन्स-क्रॉप टॉप-श्रग परिधान करत असाल तर, लहान किंवा मोठ्या आकाराच्या रिंगा घालू शकता.
10 / 10
बाजारात हूप झुमका देखील मिळतो, मोठ्या किंवा लहान आकाराच्या रिंगाखाली, मोत्यांच्या डिझाईन्सचे लोंबणारे बेल आकाराचे झुमके लटकलेले असतात. हूप झुमका मुख्य म्हणजे घागरा-चोळीवर उठून दिसतात.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री गरबा २०२३