Join us

कुर्त्यांच्या-ड्रेसच्या कापडानुसार निवडा योग्य ब्रा, पाहा त्याचे फायदे! चुकीची ब्रेसियर आरोग्यासाठी घातक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 18:44 IST

1 / 7
रोजच्या वापरातील कुर्ते हे ऑफिसवेअर आणि कॅज्युअल ( Types of Bras to wear with Kurtas) किंवा फॉर्मल लूक देखील देतात. आपल्यापैकी बऱ्याचजणी असतील ज्या रोज वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते (Which type of bra should wear under a Kurti ) घालणं पसंत करतात. हे कुर्ते अनेक वेगवेगळ्या फॅब्रिक्स पासून तयार केलेले असतात त्यामुळे त्या कुर्त्यांच्या आत घातल्या जाणाऱ्या ब्रेसीयरचा प्रकार देखील तितकाच महत्वाचा असतो. कुर्त्याच्या पॅटर्न किंवा फॅब्रिकनुसार आत कोणत्या प्रकारची ब्रेसीयर घालावी ते पाहूयात.
2 / 7
१. जेव्हा तुम्ही पांढऱ्या किंवा कोणत्याही पेस्टल शेड्सचा लाईट रंग असणारा कुर्ता घालाल तेव्हा त्यात न्यूड रंगाच्या ब्रेसीयर घालाव्यात. न्यूड म्हणजेच लाईट बॉडी कलर किंवा स्किन कलर अशा लाईट रंगाच्याच ब्रेसीयरची निवड करावी. जेणेकरुन कुर्त्याच्या फिक्या रंगामुळे आतली ब्रेसीयर दिसणार नाही.
3 / 7
२. जेव्हा तुम्ही डार्क रंगाचा कुर्ता किंवा हेव्ही वर्क असणारा कुर्ता घालाल तेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या ब्रेसीयर घालू शकतो. अशावेळी शक्यतो डार्क कलर किंवा प्रिंटेड तसेच नेटेड ब्रा देखील घालू शकता.
4 / 7
३. सुळसुळीत किंवा मलमलचे कापड असणाऱ्या फॅब्रिक्स मधील कुर्ते घातले तर असे कुर्ते अंगाला चिकटून बसतात. जेव्हा आपण अशा अंगाला चिकटून बसणाऱ्या फॅब्रिक्सचे कुर्ते घालाल तेव्हा त्यात कायम काळ्या किंवा न्यूड रंगाच्या टी - शर्ट ब्रा घालाव्यात. अशाप्रकारे कुर्त्याचे अंगाला चिकटणारे कापड असले तरीही टी - शर्ट ब्रा च्या फिटिंगमुळे कपडे अंगाला चिकटून बसत नाही.
5 / 7
४. जेव्हा तुम्ही फॅन्सी नेकलाईन किंवा ऑफशोल्डर असणारे कुर्ते किंवा ड्रेस घालता तेव्हा स्ट्रॅपलेस ब्रा घालावी. स्ट्रॅपलेस ब्रा मध्ये ब्रा च्या खांद्यावर असणाऱ्या पट्ट्या नसतात त्याऐवजी मागच्या बाजूला या ब्रेसीयरचा पट्टा असतो. यामुळे फॅन्सी नेकलाईन किंवा ऑफशोल्डर कुर्त्यामधून ब्रेसीयरच्या पट्ट्या बाहेर डोकावत नाहीत.
6 / 7
५. जर तुम्ही वी-नेक पॅटर्नचे कुर्ते घालणार असाल तर अशावेळी डिप वी-नेक मधून ब्रा दिसू नये म्हणून डेमी कफ ब्रा घालावी. डेमी कफ ब्रा या प्रकारामध्ये ब्रा चे कप्स हे शॉर्ट किंवा लहान असतात. ज्यामुळे ते सहजासहजी वी-नेक पॅटर्नच्या कुर्त्यामधून दिसत नाहीत.
7 / 7
६. जर तुम्ही बॅकलेस पॅटर्नचा कुर्ता घालणार असाल तर त्यात निप्पल कव्हर किंवा असे बॅकलेस कुर्ते खरेदी करा ज्यात आधीपासूनच कप्स लावलेले असतील.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स