जुन्या साडीचा लेकीसाठी नवाकोरा ड्रेस! पाहा साडीच्या ड्रेसच्या ७ आयडिया, लेक लाखांत उठून दिसेल
Updated:March 6, 2025 16:23 IST2025-03-06T12:11:31+5:302025-03-06T16:23:08+5:30

जवळपास सगळ्याच महिलांकडे अशा बऱ्याच साड्या असतात ज्या जुन्या झालेल्या असतात. पण तरीही त्यांच्यामध्ये जीव अडकून पडलेला असल्याने त्या काढूनही टाकाव्या वाटत नाहीत. अशा साड्यांचा तुमच्या लेकीसाठी खूप छान पद्धतीने वापर करता येईल.सध्या लग्नसराईचे दिवस सुरूच आहेत. तुमच्या घरातल्या जुन्या साड्या घेऊन त्यापासून तुमच्या मुलींसाठी तुम्ही खूप छान ड्रेस शिवू शकता. ड्रेस नेमका कसा शिवावा, याच्या आयडिया पाहिजे असतील तर हे काही फोटो पाहा..
असा सुंदर फ्रिलचा फ्रॉक किंवा वनपीस तुम्ही शिवू शकता..
असे अनेक प्रकारचे आकर्षक ड्रेससुद्धा तुम्हाला शिवता येतील. यातला प्रत्येक ड्रेस अंगावर नक्कीच शोभून दिसेल.
साधी कॉटनची साडी असेल तरी तिच्यापासून अशा पद्धतीचे दोन स्टायलिश ड्रेस शिवता येतात..
कॉलेजगोईंग मुलींना थोडे ट्रेण्डी ड्रेस आवडतात. त्यांच्यासाठी हे डिझाईन्स पाहा.. मुलींना नक्कीच आवडतील.
थोडा फेस्टिव्ह लूक देणारा ड्रेस शिवायचा असेल तर हे एक डिझाईन पाहा.. अतिशय वेगळ्या पद्धतीने तो शिवला असल्यामुळे अतिशय कॅची लूक देतो.
अशा पद्धतीचा कुर्ता आणि त्याच्याखाली स्कर्ट अशा पद्धतीचा अतिशय फॅशनेबल ड्रेसही तुम्ही शिवून घेऊ शकता.
शिफॉनच्या साड्यांपासून अशा पद्धतीचे ड्रेस शिवता येतील. बांधणी किंवा लेहेरिया या प्रकारातल्या साड्या असतील तरीही असे ड्रेस शिवा, मुली खूप छान दिसतील.