Women's Day 2025 : महिला दिनाच्या पार्टीसाठी ऑफिसमध्ये साडी नेसून जायचंय? पाहा ८ पर्याय, दिसा स्टायलिश...
Updated:March 7, 2025 15:43 IST2025-03-07T15:32:29+5:302025-03-07T15:43:06+5:30
International Womens Day Saree Look Fashion Beauty Tips Beautiful Saree Designs For Womens Day : Best Saree Styles for Women on International Womens Day : महिला दिनानिमित्त ऑफिसमध्ये नेसा ‘या’ डिझाईन्सच्या सुंदर साड्या, दिसाल स्टायलिश - आकर्षक....

दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिन (Women's Day 2025) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांसाठी ऑफिसमध्ये (International Womens Day Saree Look Fashion Beauty Tips Beautiful Saree Designs For Womens Day) वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सणवार किंवा कोणताही खास दिवस असला की महिला साडी नेसणे पसंत करतात. परंतु प्रत्येक खास प्रसंगी नेमकी कोणत्या पद्धतीची साडी नेसावी असा प्रश्न पडतो. यासाठीच, यंदाच्या महिला दिनी ऑफिसमध्ये नेसण्यासाठी साड्यांच्या काही सुंदर आणि आकर्षक डिझाइन्स आपण पाहूयात.
महिला दिनी ऑफिसमधील कार्यक्रमासाठी नेमकी कोणत्या (Best Saree Styles for Women on International Womens Day) पद्धतीची साडी नेसावी, जेणेकरून आपण छान - सुंदर दिसण्यासोबतच दिवसभर कम्फर्टेबल देखील राहू शकतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॉटनच्या साड्या महिला आवडीने नेसतात. त्यामुळे महिला दिनाच्या कार्यक्रमात तुम्ही मल कॉटनमधील सुंदर साडी नेसू शकता.
सध्या टिशू सिल्क साड्यां फार मोठ्या प्रमाणांवर ट्रेंडिंग आहेत. यासाठी आपण आपल्या आवडत्या रंगाची टिशू सिल्क साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लॉऊज घालून सुंदर लूक कॅरी करु शकता. तुम्ही केलेला लुक सगळ्यांना नक्कीच आवडेल.
काहींना डिझायनर पण जास्त हेवी साड्या नेसायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही या पद्धतीची सॉफ्ट सिल्क असलेली सुंदर साडी नेसू शकता. ही साडी कोणत्याही कार्यक्रमात सुंदर आणि आकर्षक दिसेल.
लाल रंगाची बनारसी साडी कोणत्याही कार्यक्रमासाठी अगदी उत्तम शोभून दिसते. सोनेरी किंवा चंदेरी काठ असलेली बनारसी साडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नेसू शकता.
पैठणी साडी ही सगळ्यांचं महिलांची पहिली पसंती असते. त्यामुळे तुम्ही पैठणी साडी देखील नेसून अगदी साधा सोपा लूक कॅरी करु शकता. पैठणी साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते. त्यामुळे ऑफिसमध्ये नेसण्यासाठी पैठणी साडी उत्तम पर्याय आहे.
प्रोफेशनल लुकसाठी तुम्ही अशा प्रकारची लिनेन साडी नेसू शकता. ही साडी आरामात कॅरी करता येते आणि या साडीत तुम्ही स्टायलिशही दिसाल. या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही हील्स तसेच फ्लॅट किंवा कोलापुरी चप्पल घालू शकता.
या वर्षीची महिला दिनाची थीम ही फ्लोरल असल्याने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लोरल प्रिंट्सच्या साड्या देखील नेसू शकता. या फ्लोरल प्रिंट्सच्या साड्या नेसायला अगदी सहजसोप्या आणि वजनाने हलक्या असतात. त्यामुळे आपण अशा हलक्या आणि कम्फर्टेबल साड्या नेसून ऑफिसमध्ये अगदी सहजपणे वावरू शकता.
जर आपल्याला फार हेव्ही किंवा भडक रंग आवडत नसतील तर आपण साध्या पेस्टल शेडच्या कॉटनच्या साड्या देखील नेसू शकतो. या साड्या दिसायला साध्या असल्या तरी त्या एक विशिष्ट प्रकारचा प्रोफेशनल लूक देऊ शकतात.