साडीत बारीक, आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा 'हे' लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स, हेवी ब्रेस्ट असणाऱ्यांसाठी स्टायलिश पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 5:21 PM 1 / 10प्रत्येक स्त्रीला साडी नेसण्याची आवड असते. विशेषत: ज्या स्त्रिया साडीच्या शौकीन आहेत, त्यांच्याकडेही साड्यांचे चांगले खास कलेक्शन असते. (Styling Tips) स्त्रियाही साड्यांबरोबरच डिझायनर ब्लाउजचे कलेक्शन ठेवतात. एक चांगलं स्टायलिश ब्लाउज तुमच्या साध्या दिसणार्या साडीचा लूक बदलू शकते. (Blouse designs for big breast)2 / 10पण त्या स्त्रियांना ब्लाउज डिझाइन निवडणे अवघड जाते, ज्यांचे स्तन जड असतात. जड स्तनांवर ब्लाउजचे फिटिंग आणि साडीची सेटिंग याबद्दल महिलांना नेहमीच काळजी असते. अशा परिस्थितीत, बहुतेक महिलांना महागड्या आणि डिझायनर साड्यांसह शिवलेले साधे ब्लाउज देखील मिळतात. या लेखात हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी काही लेटेस्ट ब्लाऊज डिजाईन्स सांगणार आहोत. (latest Blouse desings for heavy breast)3 / 10डीप नेक आणि थ्री फोर स्लिव्हजचे ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही साडीवर शोभून दिसतील. खासकरून ज्या साड्यांना बॉर्डरवर वर्क असेल अशा साड्यांवर ब्लाऊजचं हे पॅटर्न शोभून दिसतं. 4 / 10व्ही लाईन नेक किंवा स्ट्रेट लाईन ब्लाऊजसुद्धा उत्तम पर्याय असतील. बॉलिवूड अभिनेत्रींच्या ब्लाऊजप्रमाणे तुम्हीही ट्रेंड फॉलो करू शकता. 5 / 10जर तुम्हीही साडीवर जॅकेट घालण्याचा विचार करत असा तर स्लिव्हजलेज ब्लाऊजवर साडीच्या रंगाप्रमाणे जॅकेट शिवून घ्या. यात तुमची ब्रेस्ट जास्त दिसून येणार नाही.6 / 10चौकोनी नेकलाइन असलेला ब्लाउज हेवी ब्रेस्टेड महिलांवरही चांगला दिसतो. 7 / 10तुम्हीही असा ब्लाउज बनवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमची छाती जड असेल आणि तुम्ही चौकोनी नेकलाइनचा ब्लाउज घातला असाल तर मानेची रुंदी कमी आणि लांबी जास्त ठेवा. तुम्ही ब्लाउजच्या मागील बाजूस चौकोनी नेकलाइन स्क्वेअर देखील ठेवू शकता. स्क्वेअर नेकलाइन असलेल्या ब्लाउजमध्ये तुम्हाला कट स्लीव्हज किंवा सेमी हाफ स्लीव्हज मिळू शकतात.8 / 10जर तुमचे दंड फार जाड नसतील आणि हेवी ब्रेस्ट असेल तर तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज कोणत्याी साडीवर शिवू शकता. याचा मागच्या गळा ओपन ठेवू शकता.9 / 10शॉर्ट स्लिव्हज किंवा फ्रिलचे, बेल बॉटम ब्लाऊज तुम्ही व्ही नेकसह ट्राय करू शकता. 10 / 10जड स्तन असलेल्या महिलांची ब्लाउजची बटणे नेहमी मागच्या बाजूला असावीत किंवा चेन उजव्या बाजूला लावलेली असावी.(All Image Credit- Social Media, Pinterest) आणखी वाचा Subscribe to Notifications