स्मार्ट लूक येण्यासाठी ब्लाऊजच्या बाह्या आकर्षकच हव्या! बघा स्लिव्ह्जचे ७ लेटेस्ट पॅटर्न- दिसाल सुंदर
Updated:September 13, 2024 18:11 IST2024-09-13T18:04:50+5:302024-09-13T18:11:16+5:30

साडी नेसल्यावर स्मार्ट लुक येण्यासाठी ब्लाऊजचा मागचा आणि पुढचा गळा जसा महत्त्वाचा असतो तसाच ब्लाऊजच्या बाह्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. (unique latest patterns of blouse sleeves)
म्हणूनच आता बाह्यांचे हे काही वेगवेगळे प्रकार बघा आणि दसरा- दिवाळीसाठी आकर्षक बाह्या असणारे सुंदर ब्लाऊज शिवून घ्या.(blouse sleeves designs)
हे एक डिझाईन बघा. यामध्ये ब्लाऊजला छोट्याशा चुन्या घालून मधोमध बटन लावले आहे.(Blouse sleeve design photo)
डिझायनर साडी असेल तर अशा पद्धतीचं फ्रिलचं ब्लाऊजही तुम्ही शिवू शकता.
कॉटन किंवा सिंथेटिक अशा कुठल्याही साडीवर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवण्याची सध्या खूप फॅशन आहे. जर तुम्ही सडपातळ बांध्याच्या असाल तर तुम्हाला हे ब्लाऊज छान दिसेल.
अशा पद्धतीचं गुलाबाचं फूल बाहीवर घेऊन एखादं ब्लाऊज शिवून बघा. एकदम स्टायलिश लूक मिळेल.
छोटंसं लटकन असलेलं हे ब्लाऊज तुमच्या हातांचं सौंदर्य वाढविणारं ठरेल.
लग्नसराईसाठी हेवी डिझाईन असणारं ब्लाऊज शिवणार असाल तर या डिझाईनचा नक्कीच विचार करू शकता.
मधोमध फुलपाखराचा आकार असणारं हे ब्लाऊज अतिशय आकर्षक दिसेल.