ब्लाऊजच्या बाह्यांसाठी एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स! मोती-लटकन लावून शिवा मस्त स्टायलिश बाह्या
Updated:December 20, 2024 18:16 IST2024-12-20T17:32:10+5:302024-12-20T18:16:21+5:30

ब्लाऊजचे गळे तर जवळपास प्रत्येक महिलाच थोड्या वेगळ्या पद्धतीने, वेगळं डिझाईन असणारं शिवते. शक्यतो ब्लाऊजच्या गळ्याचं डिझाईन पुन्हा रिपिट होत नाही.. त्याच पद्धतीने थोडा बदल ब्लाऊजच्या बाह्यांच्या बाबतीतही करून पाहा.
त्यासाठीच बघा ब्लाऊजच्या बाह्यांसाठी हे काही वेगवेगळे डिझाईन्स.. साडीमधला तुमचा लूक खुलून यायला त्याची नक्कीच मदत होईल.
अशा पद्धतीचं छोट्या छोट्या खिडक्या असणारं डिझाईनही तुम्ही घेऊ शकता.. ब्लाऊजच्या बाह्या जर व्यवस्थित फिटींगच्या असतील तर हात खूप छान दिसतात.
अशा पद्धतीचे लटकन लावूनही तुम्ही ब्लाऊजच्या बाह्या अधिक आकर्षक करू शकता.
बाह्यांवर मोत्यांच्या छोट्या माळा लावलेलं असं एखादं डिझाईनही खूप छान दिसतं..
शिफॉन साडी असेल तर तिच्यावरच्या ब्लाऊजच्या बाह्या अशा घेरदार आणि लांबलचक करू शकता. अशा पद्धतीच्या ब्लाऊजमुळे साडी साधी असेल तरी तिला खूप छान लूक येतो.
सध्या नेटच्या झालर असणाऱ्या बाह्यांची खूप फॅशन आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं एखादं ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं.
स्लिव्हलेस बाह्यांना या पद्धतीने लेस लावून अधिक सुंदर बनवू शकता. एखादी प्लेन साडी असेल किंवा नाजूक स्टोन वर्क, मोती वर्क असणारी साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवा.