Join us   

Blouse Sleeves Designs: नव्या स्टाइलचं ट्रेण्डी ब्लाऊज शिवायचंय? बघा १० आकर्षक एकसेएक सुंदर डिझाईन पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 2:55 PM

1 / 10
१. साडी घेतली की बऱ्याचदा तिच्यावरचं ब्लाउज कसं शिवायचं, हेच समजत नाही. शिवाय आपल्या कलेक्शनमध्ये असलेल्या डिझाईनपेक्षा वेगळं डिझाईन असावं, असंही वाटतं.
2 / 10
२. साडीचा लूक तेव्हाच शोभून दिसतो, जेव्हा तिच्यावरचं ब्लाउज परफेक्ट असतं. म्हणूनच कोणत्या साडीवर नेमकं कशा पद्धतीचं ब्लाउज शिवावं, ब्लाउजची डिझाईन कशी निवडावी, खास करून ब्लाउजच्या बाह्यांसाठी कोणतं डिझाईन घ्यावं, यासाठी बघा या काही खास टिप्स आणि ट्रेण्डी- आकर्षक ब्लाउजचे काही हटके पर्याय..
3 / 10
३. या अशा पद्धतीच्या ब्लाउजची सध्या चांगलीच क्रेझ आहे. काठपदराच्या साड्यांवरही अशी स्टाईल छान दिसते. शिवाय ज्या साड्यांचे ब्लाउजपीस प्लेन आहेत, अशा कोणत्याही साडीवर तुम्ही असं ब्लाउज शिवू शकता.
4 / 10
४. साडीवर मिररवर्क किंवा मोती- कुंदन लावून अशा पद्धतीने बाजूबंद डिझाईन करून घेण्याची ही फॅशनही सध्या गाजते आहे.
5 / 10
५. एखादी डिझायनर साडी असेल किंवा कॉटन साडी असेल तर तिच्यावर स्टायलिश लूक मिळविण्यासाठी अशा पद्धतीचं नेटच्या बाह्या असणारं ब्लाउज उठून दिसेल.
6 / 10
६. अशा पद्धतीचं जाळीदार बाह्या असणारं ब्लाउजही खुलून दिसेल.
7 / 10
७. पफ स्लिव्ह्ज म्हणजे फुग्याच्या बाह्यांचीही फॅशनही सध्या इन आहे. फक्त आता त्याच्या पॅटर्नमध्ये जरा बदल झाला आहे. वरच्या बाजूने फुगा आणि खाली अगदी घट्ट फिटिंग असलेलं.. असं ब्लाउजही लग्नसराईमध्ये गाजतंय.
8 / 10
८. अशा पद्धतीने मिररवर्क, एम्ब्रॉयडरी, मोती वर्क केलेलं ब्लाउज तर सध्या अनेक नववधूंकडून हौशीने शिवलं जात आहे. एवढंच नाही तर लग्नसराईसाठी अनेक जणी असं ब्लाउज आवर्जून शिवून घेत आहेत.
9 / 10
९. अशा फ्रिलच्या ब्लाउजचीही सध्या फॅशन आहे. असं ब्लाउज घातलं तर अगदी साध्या साडीवरही पार्टीवेअर, ट्रेण्डी लूक मिळू शकतो.
10 / 10
टॅग्स : फॅशनब्यूटी टिप्ससाडी नेसणे