खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2024 3:23 PM 1 / 8उन्हाळ्यात भडक, गडद रंगाचे कपडे नकोसे वाटतात. शुभ्र पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे या दिवसात घातले की आपलं आपल्यालाच कूल- थंड वाटतं.2 / 8म्हणूनच उन्हाळ्यात पांढऱ्या, मोतिया रंगाचे कपडे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. उन्हाळ्यानिमित्त तुम्हालाही पांढरी, मोतिया, क्रिम कलरची साडी नेसण्याचा विचार असेल तर बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही मस्त लूक एकदा पाहून घ्या.3 / 8खास उन्हाळ्यासाठी अशी हलकी- फुलकी ऑर्गेंझा साडी घेऊ शकता. उन्हाळ्यासाठी ऑर्गेंझा साडी हा एक छान पर्याय आहे.4 / 8पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साड्याही या दिवसांत खूप ट्रेण्डिंग असतात. अशी एखादी साडी तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवायला हरकत नाही.5 / 8ओनम साडी किंवा केरला साडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या साड्या उन्हाळ्यातल्या छोटेखानी कार्यक्रमांना घालायला चांगल्या आहेत.6 / 8ओनम साडीतलाच हा आणखी एक प्रकार. करिश्माने ती साडी जास्त छान पद्धतीने आणि फेस्टिव्ह लूक देऊन कॅरी केली आहे.7 / 8ऑफिससाठी नेसणार असाल तर हा एक पांढऱ्या कॉटन साडीतला डिसेंट लूक बघा. 8 / 8छोटेखानी कार्यक्रमांत किंवा ऑफिससाठी हा लूकही अगदी छान आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications