श्रीदेवीसारखेच आहे लेकीचे साडीप्रेम, पाहा जान्हवी कपूरचे साडी कलेक्शन - आणि परफेक्ट लूकचे सिक्रेट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 9:50 AM 1 / 8बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या साडी प्रेमाबद्दल आपल्याला माहितच आहे. एखादा मोठा इव्हेंट असो वा कोणाचे लग्न जान्हवी बरेचदा साडीमध्ये दिसते (bollywood actress Janhavi kapoor love for saree).2 / 8पारंपरिक काठपदराची साडी असो किंवा डिझायनर ती कोणत्याही प्रकारची साडी तितक्याच उत्तम पद्धतीने कॅरी करते.कमीत कमी मेकअप आणि दागिने घालूनही तिच्यावर कोणत्याही रंगाची साडी छान खुलून दिसते. 3 / 8वेस्टर्न पद्धतीचे साडी ड्रेपिंग प्रकारही ती अनेकदा छान कॅरी करताना दिसते. यामध्ये ती थोडीही अस्वस्थ असल्याचे दिसत नाही. पाहा पांढऱ्या रंगाची ही साडी आणि त्यावर अतिशय वेगळ्याच फॅशनचे असलेले हे ब्लाऊज ती किती छान कॅरी करत आहे. 4 / 8तिचा फिटनेस, डाएट यामुळे तिची कायम फिगर अतिशय छान असल्याने चाहते तिच्यावर फिदा असतात. या फिगरमुळेच तिच्यावर कोणत्याही फॅशनचे कपडे अतिशय छान दिसतात.अगदी वेगळ्या पद्धतीने नेसलेली ही गुलाबी रंगाची साडी कोणतेही दागिने घातलेले नसताना जान्हवीवर खुलून दिसते. 5 / 8विविध ब्रँडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ती ट्राय करताना दिसते. यामध्ये अगदी ९० च्या दशकातील साड्यांपासून तिच्या आईच्या म्हणजेच श्रीदेवीच्या साड्यांचाही समावेश असतो.6 / 8तिच्या फॅशनचे आणि स्टाईल्सचे कायम तिच्या चाहत्यांकडून कौतुक होताना दिसते आणि तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात.फ्लोरल प्रिट ही जान्हवीच्या साड्यांची खासियत असून त्या प्रकारच्या साड्याही ती छान कॅरी करते. 7 / 8केस मोकळे सोडलेले असोत नाहीतर बांधलेले, साडी कॅरी करण्याचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. तो जान्हवीकडे चांगला असल्याने तिच्यावर साड्या शोभून दिसतात. 8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications